Foreign Job: नोकरीच नाही तर घर आणि सवलती, या देशात परदेशी नागरिकांना स्थायिक होण्याची मोठी संधी

Foreign opportunity to Skilled Employees: परदेशात स्थायिक होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. काही देशांनी परदेशी नागरिकांसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. या देशात नोकरीच नाही तर घर आणि सवलतीही जाहीर केल्या आहेत.

Foreign Job: नोकरीच नाही तर घर आणि सवलती, या देशात परदेशी नागरिकांना स्थायिक होण्याची मोठी संधी
नोकरीसह घर आणि सवलती, या देशात स्थायिक होण्याची मोठी संधी
| Updated on: Nov 26, 2026 | 2:24 PM

Foreign opportunity to Skilled Employees: चांगल्या संधीच्या शोधात अनेक जण परदेशात जाण्याचा विचार करतात. काही देश स्थानिक गरजा आणि लोकसंख्येचा समतोल साधण्यासाठी परदेशातील नागरिकांना मोठी संदी देत आहेत. या योजनेतंर्गत सोपी व्हिसा प्रक्रिया, आर्थिक सहाय्यच नाही तर स्वस्तात आणि मोफत घर उपलब्ध करून दिल्या जाते. कर सवलत देण्यात येते. रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येते. कोणत्या देशात आणि कुठे मिळते अशी संधी?

या देशात परदेशी नागरिकांना मोठी संधी

Loading...

१.कॅनडामधील लहान शहरांमध्ये लोकसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने ग्रामीण आणि उत्तरी पट्ट्यात खास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. परदेशी नागरिकांना कायमस्वरुपी वास्तव्याची संधी देण्यात येत आहे. त्यासाठी योग्य शहरात नोकरीची संधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

२.इटलीतील प्रेसिचे अथवा सम्बुका यासारख्या काही छोट्या गावांमध्ये स्थायिक होण्यासाठी 25,000 युरोपर्यंत आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. पण इथे घर खरेदी करून त्याचे नुतनीकरण करण्याची त्याच व्यक्तींची जबाबदारी असते.

३.जपानमध्ये घटत्या लोकसंख्यने चिंता वाढली आहे. रिकाम्या घरांसाठी अकिया असा एक उपक्रम तिथे सुरू आहे. या ठिकाणी परदेशी नागरिकांना मोफत घरे अथवा अत्यल्प दरात घरं उपलब्ध करून देण्यात येतात. इतकेच नाहीतर अर्थसहाय्य देण्यात येते. पण ग्रामीण भागात राहून स्थानिक जीवनशैली स्वीकारणे गरजेचे आहे.

४.जर्मनी या देशात कुशल कामगारांची मोठी गरज आहे. EU Blue Card सारख्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. येथे कुशल कामगारांना चांगले वेतन, मोफत शिक्षण आणि आरोग्य विमा या सारख्या सुविधा देण्यात येतात. पण अगोदर उच्च पात्रता आणि नोकरीची संधी शोधावी लागते.

५.युरोपातील स्पेनमधील पोंगासारख्या काही गावांमध्ये नवीन कुटुंबांना 3,000 युरोपर्यंत मदत आणि मुलांसाठी अतिरिक्त बोनस देण्याच्या योजना असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण बोनस योजना सर्वांनाच लागू होत नाही.

अर्ज करण्यापूर्वी काय काळजी घ्याल?

अर्ज करण्यापूर्वी त्या त्या देशांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन खातरजमा करा. त्या देशाची स्थानिक भाषा, पात्रता, रोजगारासाठीची अट आणि शर्ती समजावून घ्या. संबंधित देशाच्या दुतावासाला आवश्य भेट द्या. योजना समजावून घ्या. कोणत्याही दलालावर विश्वास ठेवू नका. योग्य सल्लागाराची मदत घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us