सरकारचा सर्वात मोठा निर्णय! शहरात प्रत्येक घराला आता डिजिटल कार्ड, जमिनाचा वाद कायमचा मिटणार
राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. जमिनीच्या अधिकार अभिलेखांसाठी आता स्वतंत्र डिजिटल कार्ड निर्माण केले जाणार आहे. राज्यातील जमिनीच्या नोंदणी आणि मालकी हक्कांच्या अभिलेखांमध्ये मोठा बदल करण्याची तयारी सरकार करत आहे.

मिनीच्या अधिकार अभिलेखांसाठी आता स्वतंत्र डिजिटल कार्ड
राज्यातील जमिनीच्या नोंदणी आणि मालकी हक्कांच्या अभिलेखांमध्ये मोठा बदल करण्याची तयारी
प्रत्येक पात्र सदनिकाधारकाला स्वतंत्र पूरक अधिकार अभिलेख देण्याचा प्रस्ताव
ग्रामीण भागातील जमिनींसाठी ७/१२ उताऱ्याप्रमाणेच नगर भूमापन क्षेत्रातही स्वतंत्र नोंदीची व्यवस्था
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अंतर्गत इमारतीतील सदनिकांचे अधिकार अभिलेख आणि नोंदवही तयार करण्यासाठी २०२६ चे नियम प्रस्तावित
सदनिकेचा क्रमांक, धारकाचे नाव, मंजूर क्षेत्रफळ, संबंधित हक्क, बोजे आणि सामाईक क्षेत्राची स्वतंत्र नोंद होणार
मसुदा नियमांवर ३० दिवसांत हरकती व सूचना मागविणे, त्यानंतर नियम अंतिम करून प्रायोगिक अंमलबजावणीचा प्रस्ताव
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
