AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: 6% वार्षिक पगारवाढ, 50% DA बेसिकमध्ये विलीन करण्याची मागणी; कर्मचाऱ्यांच्या 5 प्रमोशनसह 73 महत्त्वाचे प्रस्ताव!

8th Pay Commission Big Demand's: आठवा वेतन आयोग आपला अहवाल मे २०२७ मध्ये सरकारला सादर करणार आहे. जशी ही मुदत जवळ येत आहे, तसतशी कर्मचारी संघटनांच्या मागण्यांची यादीही वाढत चालली आहे.

8th Pay Commission: 6% वार्षिक पगारवाढ, 50% DA बेसिकमध्ये विलीन करण्याची मागणी; कर्मचाऱ्यांच्या 5 प्रमोशनसह 73 महत्त्वाचे प्रस्ताव!
8th Pay Commission Big Demand
| Updated on: Nov 26, 2026 | 2:20 PM
Share

8th Pay Commission Latest News: आठव्या वेतन आयोगाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. पगारवाढ, महागाई भत्ता, पेन्शन, पदोन्नती आणि विमा संरक्षण अशा विविध मुद्द्यांवर कर्मचारी संघटनांनी आयोगासमोर मागण्यांचा पाढा वाचला आहे. विशेष म्हणजे, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने (BPMS) तब्बल 73 प्रस्ताव आयोगाकडे सादर केले आहेत. यामध्ये सध्याची 3 टक्के वार्षिक पगारवाढ थेट 6 टक्क्यांपर्यंत वाढवण्यापासून ते कर्मचाऱ्यांना संपूर्ण सेवाकाळात पाच प्रमोशन देण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे. आता या मागण्यांपैकी कोणत्या प्रस्तावांना सरकारची मंजुरी मिळणार, याकडे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

3% ऐवजी 6% वार्षिक पगारवाढ देण्याची मागणी

आठव्या वेतन आयोगासमोर BPMS ने मांडलेल्या प्रस्तावांमध्ये पगारवाढीचा मुद्दा विशेष महत्त्वाचा आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी 3 टक्के इन्क्रिमेंट मिळते. मात्र, वाढती महागाई आणि खर्च लक्षात घेता ही वाढ दुप्पट करून 6 टक्के करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. याशिवाय महागाई भत्त्याबाबतही मोठा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या DA पैकी 50 टक्के रक्कम मूळ वेतनात (Basic Pay) समाविष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होण्यास मदत होऊ शकते.

पेन्शन व्यवस्थेतही बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या लागू असलेल्या NPS आणि UPS ऐवजी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरू करावी, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

15 लाखांचे विमा संरक्षण आणि सेवेत 5 प्रमोशन!

BPMS च्या 73 मागण्यांमध्ये केवळ पगार आणि पेन्शनच नाही, तर कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांचाही समावेश आहे. संघटनेच्या प्रस्तावानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या संपूर्ण सेवाकाळात किमान पाच वेळा पदोन्नती मिळण्याची व्यवस्था असावी. साधारण 30 वर्षांच्या नोकरीच्या कालावधीत पाच प्रमोशन मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या करिअरमध्ये आणि उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. तसेच, सेंट्रल एम्प्लॉईज ग्रुप इन्शुरन्स स्कीमअंतर्गत मिळणारे विमा संरक्षण वाढवून 15 लाख रुपये करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

इतर मागण्यांमध्ये:

पुरुष कर्मचाऱ्यांसाठी पितृत्व रजा (Paternity Leave) 45 दिवसांची करावी.

चाइल्ड केअर लीव्हची सुविधा 12 वर्षांपर्यंत उपलब्ध करून द्यावी.

वेतन, पदोन्नती, फिटमेंट फॅक्टर आणि रजा सुविधांमध्ये सुधारणा करावी.

मे 2027 मध्ये सरकारकडे सादर होणार अहवाल

आठव्या वेतन आयोगाला आपल्या शिफारशींचा अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. हा अहवाल मे 2027 मध्ये केंद्र सरकारकडे सादर होण्याची अपेक्षा आहे. सध्या आयोगाकडून कर्मचारी संघटना आणि विविध प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे. या बैठकांमध्ये वेतनवाढ, महागाई भत्ता, पेन्शन आणि इतर सुविधांबाबत सूचना व प्रस्ताव स्वीकारले जात आहेत.

मात्र, कर्मचारी संघटनांनी केलेल्या सर्व मागण्या सरकार स्वीकारेलच असे नाही. आयोगाच्या शिफारशींचा विचार करून अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे.

फिटमेंट फॅक्टर वाढल्यास किमान वेतनात मोठी वाढ?

आठव्या वेतन आयोगाबाबत सर्वाधिक चर्चा फिटमेंट फॅक्टरची सुरू आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या नव्या मूळ वेतनाची निश्चिती करताना फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावतो. सातव्या वेतन आयोगात 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 7,000 रुपयांवरून वाढून 18,000 रुपये झाले होते. आता आठव्या वेतन आयोगासाठी हा फिटमेंट फॅक्टर 2.75 ते 3.83 पर्यंत वाढवण्याची मागणी विविध कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे.

या मागण्या मान्य झाल्यास किमान मूळ वेतनात किती वाढ होऊ शकते, याचे गणित पाहूया.

2.75 फिटमेंट फॅक्टर: सध्याचे 18,000 रुपये मूळ वेतन वाढून 49,500 रुपये होऊ शकते. 3.83 फिटमेंट फॅक्टर: मूळ वेतन वाढून 68,940 रुपये होऊ शकते. मात्र, हे आकडे कर्मचारी संघटनांच्या मागण्यांवर आधारित आहेत. आठव्या वेतन आयोगाने किंवा केंद्र सरकारने या फिटमेंट फॅक्टरला अद्याप अंतिम मंजुरी दिलेली नाही.

सरकार या मागण्या मान्य करणार का?

6 टक्के वार्षिक इन्क्रिमेंट, DA चे 50 टक्के बेसिकमध्ये विलीनीकरण, पाच प्रमोशन, 15 लाखांचे विमा संरक्षण आणि वाढीव फिटमेंट फॅक्टर या मागण्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता आठव्या वेतन आयोगाच्या चर्चेत या प्रस्तावांना किती महत्त्व मिळते आणि अंतिम शिफारशींमध्ये त्यांचा समावेश होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मे 2027 मध्ये सादर होणाऱ्या अहवालाकडे देशभरातील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळे....
Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर
शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह
BMC : चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह अनेक ठिकाणांना बॉम्बने उडवण्याचा इशारा
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे..
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये....
Mumbai : MNS : दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये कार्यकर्त्यांनी थेट लावले मुंबईचे पोस्टर
NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत....
Sanjay Raut on Supriya Sule : NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान....
Devendra Fadnavis : 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, मुंबई कधीही...