
रक्षाबंधनाच्या दिवस यंदा अंतराळातील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्यांसाठी देखील खास असणार आहे. कारण यंदा 19 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेच्या दिवशीचा चंद्र ब्ल्यू मून म्हणून ओळखला जात असतो. परंतू चंद्राला ब्ल्यू मून म्हणजेच निळा चंद्र का म्हटले जात असते. याविषयी लोकांना उत्सुकता आहे. या दिवशीच्या चंद्राला निळा चंद्र म्हणण्यामागचे वैज्ञानिक कारण काय ? कधी ‘सुपर मून’ तर कधी ‘ब्ल्यू मून’ अशी चंद्राची नावे का पाडण्यात आली आहेत. ते पाहूयात…..
चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीवर भरती आणि ओहोटी होत असते. चंद्र पृथ्वीची प्रदक्षिणा घालत असतो. असे पृथ्वी भोवती फिरताना तो कधी-कधी पृथ्वीच्या जवळ येतो.तर कधी खूप दूर जातो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या 90 टक्के जवळ असतो. तेव्हाच्या घटनेला सुपर मून असे म्हटले जाते. कारण या दिवशी चंद्र एकदम मोठा आणि 30 टक्के जास्त प्रकाशमान दिसत असतो. याला सुपर मून म्हणतात. आता ब्ल्यू मून कशाला म्हणतात ते पाहूयात….
प्रत्येक दिवस चंद्राची कला बदलत असते. प्रत्येक दिवशी तो कलेकलेने वाढत जातो. आठ टप्प्यात चंद्राची प्रतिभा आपल्या दिसते. कधी पौर्णिमेचा फूल मून, तर कधी अर्धा भाकरीसारखा, तर कधी ईदच्या चंद्र कोरी सारखा..तर कधी चंद्र लुप्त होतो त्याला अमावस्या म्हणतात. हे चक्र महीनाभर सुरु असते. त्यामुळे वर्षभरात सामान्यत: 12 पौर्णिमा पाहायला मिळतात.
‘Blue Moon’ नावाचा प्रकार ही विशेष खगोलीय घटना नाही. कोणत्याही इतर पौर्णिमेत दिसणाऱ्या चंद्राप्रमाने हा ‘Blue Moon’ असतो. यात एकाच महिन्यात दुसऱ्यांदा जर पौर्णिमा आली तर तिला ब्ल्यू मून म्हटले जाते.चंद्राच्या कलांचे एक चक्र पूर्ण होण्यास सामान्यत: 29.5 दिवस लागतात. म्हणजेच 12 चंद्र चक्रांना 354 दिवस लागतात.या कारणाने दर 2.5 वर्षांनी एक कॅलेंडर वर्षात 13 वी पौर्णिमा असते. या 13व्या पौर्णिमेला ब्ल्यू मून म्हटले जाते. हा दिवस येत्या 19 ऑगस्ट रोजी येत आहे. गेल्या वेळचा ब्ल्यू मून 30 ऑगस्ट 2023 रोजी होता. ब्ल्यू मून दर दोन ते तीन वर्षांनी येतो. आता पुढील ब्ल्यू मून 31 मे 2026 होणार आहे.
नासाच्या मते 1883 मध्ये इंडोनेशियात क्राकाटोआ ज्वालामुखीचा स्फोट झाला होता. त्यावेळी त्याची राख आकाशात सुमारे 80 किलोमीटर वरती हवेत पसरली होती. त्यामुळे धूसर चादर पसरली गेल्याने चंद्र निळसर आणि हिरव्या रंगाचा दिसत होता. 1983 मध्ये मॅक्सिकोत एल चिचोन ज्वालामुखीचा स्फोट आणि 1980 मध्ये माऊंट सेंट हेलेन्स आणि 1991 मध्ये माऊंट पिनातुबोचा स्फोट अशा घटनांमुळे देखील चंद्र वेगळा दिसत होता.