60 रुपयांची ही गोष्ट खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी, थेट 10 ते 15..

डिमार्टमध्ये अनेक गोष्टींवर मोठी सवलत मिळते. विशेष म्हणजे डिमार्ट किराणा खरेदी केला तर पैशांची बचत होते. अगदी चांगल्या गोष्टी स्वस्तामध्ये डिमार्टमध्ये मिळतात. सध्या अशाच एका गोष्टीसाठी डिमार्टमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली.

60 रुपयांची ही गोष्ट खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी, थेट 10 ते 15..
DMart Crowd
| Updated on: Aug 01, 2026 | 3:09 PM

डिमार्ट म्हटले की, सर्वांनाच खरेदीसाठी जावे वाटते. घरातील प्रत्येक सदस्याला लागणारे गरजेचे सामान्य आज डिमार्टमध्ये मिळते. शिवाय एका छताखाली आणि तेही स्वस्तामध्ये घरगुती वस्तू खरेदी करता येतात. जर डिमार्टमध्ये महिन्याचा किराणा भरला तर मोठी पैशांची बचत होते. शिवाय डिमार्टकडून कायमच एका वस्तूवर अजून एक वस्तू फ्रीमध्ये दिली जाते, ज्याला आपण बाय वन गेट वन म्हणतो. मोठ्या प्रमाणात वस्तूंवर सवलत दिले जाते. हेच काय तर एमआरपीपेक्षाही अत्यंत कमी दरात वस्तू मिळतात. कोणताही सण असो, त्यादरम्यान लागणारी प्रत्येक गोष्टी डिमार्टमध्ये उपलब्ध होते. लहान मुलांसाठी डिमार्ट म्हणजे मोठी मेजवाणीच ठरते. सर्वकाही गोष्टी तिथे त्यांना मिळतात. सध्या डिमार्टमध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टींसोबतच किचनमध्ये लागणाऱ्या वस्तूंवरही मोठी सवलत मिळत आहे.

डिमार्टमध्ये पावसाळ्याच्या सीजनमध्ये फक्त छत्री, रेनकोड आणि पावसाळी चप्पलवरच सवलत आहे, असे अजिबात नाही. सध्या किचनमध्ये लागणाऱ्या गोष्टींवर मोठी सवलत आहे. अगदी कमी दरात वस्तू मिळत आहेत. त्यामध्येच ग्राहकांनी किचनमध्ये लागणारी एक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी डिमार्टमध्ये केली. ग्राहकांची तुंबड गर्दी डिमार्टमध्ये दिसतंय.

शनिवार आणि रविवार डिमार्टमध्ये खूप जास्त गर्दी असते. सकाळी एकदम लवकर गेले तरीही गर्दी असतेच. शिवाय शनिवार आणि रविवार डिमार्टकडून काही गोष्टींवर मोठी सवलत दिली जाते. डिमार्टमध्ये सध्या ग्राहकांकडून 60 रूपयांची छोटी काचेची बरणी घेण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली. ही 60 रुपयांच्या बरणीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी डिमार्टमध्ये बघायला मिळते.

या बरणीत अनेक गोष्टी ठेवता येतात. शिवाय तुम्ही त्यात काही पदार्थ घालून ऑफिसमध्येही घेऊन जाऊ शकता. अगदी स्वस्तामध्ये ही बरणी मिळत आहे. बाहेर ही बरणीची किमत जास्त आहे. एकाच वेळी 10 ते 15 बरण्या एकावेळी ग्राहक घेऊन जात आहेत. या बरणीची प्रचंड मागणी आहे. यासोबतच किचन उपयोगी अनेक गोष्टी डिमार्टमध्ये असून त्यावरही सवलत दिली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us