SonPapdi : दिवाळी सण मोठा.. सोनपापडीला नाही तोटा ! घरा-घरांत फिरणारी सोनपापडी भारतात कुठून आली ?

Diwali 2025 : सोनपापडी ही फक्त एक मिठाई नव्हे तर प्रत्येक सणाचा आनंद, उत्साह वाढवणारा, घराघरांत आनंद आणणारा पदार्थ आहे. मात्र भारतात या मिठाईचे आगमन कसे, कधी, कुठून झाले ? चला जाणून घेऊया.

SonPapdi : दिवाळी सण मोठा.. सोनपापडीला नाही तोटा ! घरा-घरांत फिरणारी सोनपापडी भारतात कुठून आली ?
सोनपापडीचा इतिहास
| Updated on: Oct 20, 2025 | 11:33 AM

Diwali 2025 : दिवाळी जशी जवळ येते, बाजारात विविध मिठाईंचे सुवास दरवळतात, दुकानात विविध गोड पदार्थ दिसू लागतात. या सणानिमित्त एकमेकांना भेटून, शुभेच्छा देताना मिठाई दिली जाते, बहुतांश लोकं तेव्हा फराळाचे आदानप्रदान तर करतात, पण त्यासोबतच एक मिठाई हमखास सगळ्यांना दिली जाते ती म्हणे सोनपापडी. ही मिठाई सर्वांत जास्त चर्चेत असते. गिफ्ट देण्यासाठी तिचा हमखास वापर केला जातो.

या मिठाईचे वैशिष्ट्य म्हणजे ती खूप चविष्ट, हलकी, सॉफ्ट, तोंडात सहज विरघळणारी असते. एवढंच नव्हे तर सण येताच सोशल मीडियावर सोनपापडीचे अनेक मीम्स व्हायरल होतात. पण सर्वांना आवडणारी, चर्चेत असणारी ही मिठाई अखेर आली कुठून, त्याचा इतिहास काय हे तुम्हाला माहीत आहे का ?

सोन पापडीची उत्पत्ती

सोन पापडीच्या इतिहासाबद्दल अनेक दावे आहेत. काहींच्या मते या गोड मिठाईची उत्पत्ती राजस्थानमध्ये झाली, तर काहींच्या मते ती महाराष्ट्रामधली आहे. पण त्याबद्दल ठोस पुरावे नाहीत. हे मिष्टान्न तुर्की पिस्मानिये सारखेच आहे, जे हलक्या, तंतुमय आणि मऊ पोतासाठी ओळखले जाते. तुर्कीमध्ये, हे मिष्टान्न बनवण्यासाठी बेसनऐवजी पीठ वापरले जाते.

भारतात सोनपापडीची सुरूवात

भारतात, सोन पापडी बनवण्याची सुरुवात महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील शहरांमध्ये झाली असे मानले जाते. महाराष्ट्राने हा गोड पदार्थ प्रथम तयार केला गेला आणि त्याची चव हळूहळू संपूर्ण राज्यात पसरली. एवढंच नव्हे तर हा गोड पदार्थ गुजरात, पंजाब आणि राजस्थान सारख्या इतर राज्यांमध्ये पसरला. त्याची चव इतकी लोकप्रिय झाली की बघता बघता सोनपापडी ही भारतातील उत्सवांचे वैशिष्ट्य बनली.

दिवाळीत खूप होते वाटप

दिवाळीत, सोन पापडी ही केवळ एक गोड पदार्थ म्हणून उरलेला नाही तर तर ती सणाचेच प्रतीक बनली आहे. सोनपापडीद्वारे कुटुंब आणि मित्रांमधील स्नेह आणि शुभेच्छा तर दिल्या जातातच पण प्रत्येक घरात आनंदाची भावनाही या मिठाईमुळे येते. लोकं सोनपापडी ही त्यांच्या घरात भेट म्हणून ठेवतात आणि सणांमध्ये ती एकमेकांना वाटतात. दिवाळी किंवा कोणताही सण आला की प्रत्येक दुकानात सोनपापडी दिसू लागते. सोशल मीडियावरही त्याचे बरेच मीम्स व्हायरल होतात.