रिटायरमेंटनंतर हवी आहे सुरक्षित कमाई? मग पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम आहे योग्य पर्याय!

तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणी ज्येष्ठ नागरिक आहे आणि तुम्ही गुंतवणुक करण्यासाठी योग्य पर्याय शोधताय आणि गुंतवणुकीसोबतच पॅसिव्ह इन्कमदेखील हवा आहे? चला या लेखातून तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय जाणून घेऊया...

रिटायरमेंटनंतर हवी आहे सुरक्षित कमाई? मग पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम आहे योग्य पर्याय!
| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 1:28 PM

सिनियर सिटिझन सेव्हिंग स्किम: तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणी ज्येष्ठ नागरिक असेल आणि गुंतवणुकीसाठी चांगली योजना शोधत असाल, तर सिनियर सिटिझन सेव्हिंग स्किम तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरु शकते.

गुंतवणूक ही प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्वाची गोष्ट असते. आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर तुम्हाला पैशांची गरज पडेल हे सांगता येत नाही. यामुळेच तुमच्याकडे नेहमीच एक ठराविक रक्कम असणे महत्वाचे आहे. जी रक्कम अशा प्रसंगी उपयोगी पडेल.

अनेक वेळा तुमचे मित्र किंवा नातेवाईक गरजेच्या वेळी तुम्हाला मदत करू शकत नाहीत. तुम्ही मात्र त्यांच्यावर अवलंबून असता. तेव्हा तुम्हाला अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. यामुळेच योग्यवेळी स्वतःसाठी गुंतवणूक करत रहा. जेणेकरून तुम्ही भविष्यातील त्रास टाळू शकाल.

सध्या अनेक ज्येष्ठ नागरिक सुद्धा गुंतवणुकीचे चांगले साधन शोधत आहेत. जर तुम्ही देखील यातीलच एक असाल आणि गुंतवणुकीसाठी चांगली स्किम शोधत असाल तर ही योजना तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरु शकते. ज्यामधून तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम मिळत राहतील.

या योजनेचे नाव सिनियर सिटिझन सेव्हिंग स्किम आहे. सध्याच्या काळात ही योजना 8.2% दराने व्याज देत आहे. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणारा कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

या योजनेद्वारे तुम्ही घरी बसून दर महिन्याला 20,500 रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला वेगळे काहीही करण्याची गरज नाही. जर तुम्ही या योजनेत 30 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वर्षाला 8.2% व्याजदराने 2,46,000 रुपये मिळतील.

याचाच अर्थ, तुम्हाला घरी बसून फक्त व्याज म्हणून दर महिन्याला 20,500 रुपये मिळतील. विशेष म्हणजे या योजनेतील व्याजाचे पैसे दर तीन महिन्याला खात्यात येतात. ही पूर्णपणे सरकारी हमी योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला सेक्शन 80 C अंतर्गत टॅक्स बेनिफिट देखील मिळते.

जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ शकता. किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन देखील या योजनेसाठी अर्ज करू शकता. ही योजना 5 वर्षांसाठी आहे, जी नंतर 3 वर्षांसाठी वाढवता येते.