मराठीसह पाच भाषांना अभिजात दर्जा, यासाठी काय आहे नियमावली आणि त्याचे फायदे काय आहेत? ते जाणून घेऊयात

मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले. काही जणांना याबाबत माहिती आहे. पण बऱ्याच जणांना याचा काय फायदा आणि नेमकं काय झालं तेच माहिती नाही. अभिजात भाषा म्हणजे काय? कोणत्या नियमानुसार हा दर्जा ठरवला जातो? त्यासाठी पात्रता काय ते सर्व काही पुढे जाणून घेता येईल.

मराठीसह पाच भाषांना अभिजात दर्जा, यासाठी काय आहे नियमावली आणि त्याचे फायदे काय आहेत? ते जाणून घेऊयात
| Updated on: Oct 05, 2024 | 5:27 PM

‘माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥’ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडियावरून पोस्ट करत अनेकांनी अभिनंदन आणि आनंद साजरा केला. मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. यापूर्वी हा दर्जा सहा भाषांना मिळाला होता. केंद्र सरकारने 12 ऑक्टोबर 2004 रोजी अभिजात भाषेची श्रेणी जाहीर केली होती.सर्वात आधी तामिळ भाषेला 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर 2005 साली संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगु, 2013 मध्ये मल्याळम आणि 2014 मध्ये ओडिया भाषेला अभिजात दर्जा मिळाला होता. त्यानंतर नऊ वर्षांनी केंद्र सरकारने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. भारतात आता एकूण 11 अभिजात भाषा झाल्या आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून लढा सुरू होता. संसदेत वारंवार याबाबतची मागणी होत होती. राज्यातल्या सर्वच पक्षांनी ही मागणी लावून धरली होती. त्यामुळे अभिजात भाषा म्हणजे काहीतरी आहे, इतकीच...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा