AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC AUS vs OMA : ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतून जाता जाता नोंदवले इतके सारे विक्रम, पण…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने ओमानचा 9 गडी राखून पराभव केला. पण स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आल्याने या विजयाचा फार काही उपयोग नाही. पण जाता जाता ऑस्ट्रेलियाने बरेच विक्रम आपल्या नावावर केले आहेत. चला जाणून घेऊयात त्या बाबत...

T20 WC AUS vs OMA : ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतून जाता जाता नोंदवले इतके सारे विक्रम, पण...
T20 WC AUS vs OMA : ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतून जाता जाता नोंदवले इतके सारे विक्रम, पण...Image Credit source: Icc X account
| Updated on: Feb 20, 2026 | 10:49 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा शेवट विजयाने झाला. पण निरोप गोड म्हणता येणार नाही. कारण ऑस्ट्रेलियाचा संघ टॉप संघात येतो. त्यामुळे साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात येणं ही काही चांगली बाब नाही. ऑस्ट्रेलियाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना ओमानशी झाला. या सामन्यात ओमानने प्रथम फलंदाजी करताना 16.2 षटकात सर्व गडी गमवून 104 धावा केल्या. तसेच विजयासाठी 105 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 9.4 षटकात फक्त एक गडी गमवून पूर्ण केलं. यासह सामन्यात काही विक्रम नोंदवले. चला पाहून काय विक्रम नोंदवले गेले ते..

या विक्रमांची नोंद

ओमानविरुद्धच्या सामन्यात फिरकीपटू एडम झाम्पा याची कामगिरी विशेष राहिली. त्याने 3.2 षटकात 21 धावा देत 4 गडी बाद केले. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारासह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. एडम झाम्पाचा हा सहावा टी20 वर्ल्डकप पुरस्कार आहे. या यादीत विराट कोहली आघाडीवर असून त्याने 8 पुरस्कार मिळवले आहेत. तर ख्रिस गेल, महेला जयवर्धने आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी 5 पुरस्कार मिळवले आहेत.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक चेंडू राखून विजय मिळवणाऱ्या संघाच्या यादीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत इंग्लंडचा संघ आघाडीवर असून 62 चेंडू राखून अमेरिकेविरुद्ध 2024 मध्ये 116 गाठल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाने ओमानविरूद्ध 62 चेंडू राखून 105 धावा गाठल्या आहेत.

ओमानच्या नावावर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एक नकोसा विक्रम रचला गेला आहे. बांगलादेशविरुद्ध एकाच पंगतीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. टी20 वर्ल्डकप 2007 ते 2012 या कालावधीत बांगलादेशने सलग 10 सामने गमावले होते. तर ओमानने 2021 ते 2026 कालावधीत सलग 10 पराभव पाहीले आहेत. पुढच्या पर्वात संधी मिळाली आणि पहिलाच पराभव झाला तर या यादीत पहिलं स्थान पटकावेल.

काय म्हणाला मिचेल मार्श?

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श म्हणाला की, ‘ ही एक निराशाजनक चेंज रूम आहे. प्रत्येक संघाप्रमाणे, आम्ही दोन वर्षांपासून यासाठी तयार आहोत. दुर्दैवाने, काही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये, आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळलो नाही. तुम्ही झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासारखा सामना गमावता आणि अचानक तुमच्यावर दबाव येतो. त्यांना श्रेय, ते चांगले खेळले, परंतु आम्ही सध्या खूप निराश गट आहोत. ‘

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...