चित्रकार बनता…बनता…हुकूमशहा झाला, डायनिंग टेबलवर सहज कारचे डिझाईन रेखाटले, ती बनली जगप्रसिद्ध कार

असं म्हणतात जग विजेत्याचा इतिहास लिहीते. महायुद्धात जर जर्मनी जिंकली असती तर आजचा इतिहास कदाचित वेगळा असता ! दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला असला, तरी ब्रिटनचे प्रचंड नुकसान झाले. ब्रिटिशांना भारतातून गाशा गुंडाळावा लागला. हिटलरला चित्रकार व्हायचे होते. परंतू त्याला सैन्यात भरती व्हावे लागले. अनेक जर्मन मेड कारच्या डिझाईनमध्ये हिटलरने जातीने लक्ष घातलं...

चित्रकार बनता...बनता...हुकूमशहा झाला, डायनिंग टेबलवर सहज कारचे डिझाईन रेखाटले, ती बनली जगप्रसिद्ध कार
hitler designed the prototype of beetal car design Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 5:25 PM

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलिकडेच जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचे कौतूक केल्याने वाद निर्माण झाला होता. ॲडॉल्फ हिटलरने ज्याप्रकारे ज्यूंचे ज्या प्रकारे शिरकाण केले त्याचे कोणीही सर्मथन करणार नाही. परंतू त्याने ज्या प्रकारे जर्मनी उभी केली त्याला तोड नाही अशा आशयाचं विधान राज ठाकरे यांनी केले आहे. हिटलरचा जन्म 20 मार्च 1889 मध्ये ऑस्ट्रीयातील ब्रानो आम इन येथे झाला. तर मृत्यू 30 एप्रिल 1945 मध्ये झाला. आपल्या 56 वर्षांच्या आयुष्यात हिटलरने नाझी पक्षाची स्थापना करून जर्मन नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम चेतवण्याचे काम केले. दुसऱ्या महायुद्धातील लाजीरवाण्या पराभवानंतर हिटलरने स्वत:ला संपवले. त्याने काही दिवसांपूर्वीच प्रेयसीशी विवाह केला होता. त्यानंतर दोघांनी आयुष्य संपवले… हिटलरला वेगवेगळ्या कार आवडायच्या. त्याने कारच्या अनेक प्रकल्पांना चालना दिली. पाहुयात त्याचे कारचे प्रेम…

हिटलरला चित्रकार बनायचे होते

हिटलरला नाझी पक्षाचा हुकूमशाह मानले जाते. हिटरलने जगाला दुसऱ्या महायुद्धात ढकलले. तसेच ज्यूंचा नरसंहार केल्याने त्याला जगातला सर्वा क्रुरशासक मानले जाते. हिटलरला त्याच्या वडिलांप्रमाणे सिव्हील सर्व्हंट बनायचे नव्हते. हिटलरचे प्राथमिक शिक्षण लिंज येथे झाले. त्याची अभ्यासात काही प्रगती नव्हती. सेंकडरी शिक्षणात त्याला संघर्ष करावा लागला नंतर त्याने शाळा सोडली. साल 1903 मध्ये पित्याच्या मृत्यूनंतर त्याने आर्टीस्ट बनण्यासाठी व्हीएन्नाला प्रयाण केले. परंतू व्हीएन्नाच्या अकादमी ऑफ फाईन आर्ट्स संस्थेत त्याची निवड झाली नाही. त्यानंतर त्याने स्वत:चा चरितार्थ चालविण्यासाठी पेटींगची फुटकळ कामे देखील सुरु केली.

adolf hitler

adolf hitler

फॅमिली हॅचबॅक कार

जर्मनीचा हुकूमशाह ॲडॉल्फ हिटलर याला जर्मनीला सामर्थ्यशाली राष्ट्र बनवायचे होते. हिटलरची चान्सलर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर काही आठवड्यानंतर फेब्रुवारी 1933 मध्ये एका ऑटो शोमध्ये ‘लोकांच्या मोटरायझेशन’ची घोषणा केली. 1934 सालच्या उन्हाळ्यात जर्मन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या रीच असोसिएशनने नाझीज ऑर्गनायझेशन फॉर लेझर ॲक्टीव्हीटीजने ‘सुखातून समृद्धी’ या ब्रीद वाक्याखाली जनतेच्या वापरासाठी पहिली कौटुंबिक कार तयार करण्याचे काम फर्डिनंड पोर्श ( Ferdinand Porsch ) यांच्यावर सोपविले. जर्मनीतील मर्सिडीज कंपनी आधी युद्धात सैन्यांनाही वापरता येईल अशा कार तयार करीत होती. सैन्यांसाठी चिलखती ट्रक देखील या कंपनीने तयार केले होते. आज मर्सिडीज बेंझ तिच्या दणकट आणि लक्झरीयस गाड्यांसाठी जगभर ओळखली जाते.

hitler designed the prototype of beetal car design

hitler designed the prototype of beetal car design

गाडी चालविता  न येणाऱ्या हिटलरची प्रोटोटाईपला मंजूरी

29 डिसेंबर 1935 रोजी ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या हुकूमशहा हिटलर यानी ‘त्यांच्या फोक्सवॅगन’ च्या प्रोटोटाइपला मंजूरी दिली. दोन वर्षांनंतर 26 मे 1938 रोजी वुल्फ्सबर्गमध्ये फोक्सवॅगन कारच्या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ॲडॉल्फ हिटलर आणि फर्डिनंड पोर्श ( Ferdinand Porsch ) हे फोक्सवॅगन बीटलच्या ( Volkswagen Beetle) कारचे खरे आधारस्तंभ आहेत. फर्डिनंड पोर्श हा हुशार अभियंता होता, तर हिटलर हा धूर्त राजकारणी होता. ‘हे दोघे एकमेकांसाठी बनवले होते,’ स्टुटगार्ट विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक वोल्फ्राम पायटा यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. फोक्सवॅगन हा आज मर्सिडीज प्रमाणे जागतिक ब्रॅंड आहे.

हिटलरचा कार निर्मितीला  पाठिंबा

ॲडॉल्फ हिटलरच्या पाठिंब्याशिवाय पोर्शचा फोक्सवॅगन प्रकल्प कधीच साकार होऊ शकला नसता. हिटलरला मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी योग्य असलेली कॉम्पॅक्ट कार तयार करण्यासाठी सर्जनशील माणसाची गरज होती. आणि पोर्शला आर्थिक दबावाशिवाय अशी कार तयार करण्यासाठी खंबीर राजकीय पाठबळाची आवश्यकता होती असे प्राध्यापक वोल्फ्राम पायटा या लेखकाने म्हटले आहे.

Adolf Hitler inspecting the very first VW Beetle in Stuttgart, 1936

ज्यूंचं शिरकाणासाठी ट्रक

आधी तयार झालेली कार लोकांच्या दैनंदिन वापरासाठी नव्हती ती केवळ जर्मन सैन्यासाठी होती. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जर्मनी सैन्य सर्व-भूप्रदेशात सज्ज ठेवण्यात आले होते. 1934 मधील एका कंपनीचे पोर्श यांनी ब्रोशरमध्ये म्हटले आहे की “कार केवळ वैयक्तिक वापरासाठीच नव्हे तर वाहतुकीसाठी आणि विशिष्ट लष्करी हेतूंसाठी देखील योग्य असणे आवश्यक आहे.” हिटलरने ब्रॅंडेड कारच्या इंजिनियरना कारमध्ये गॅस चेंबर बनविण्याचे आदेश दिले होते. ट्रकच्या आत पाठच्या बाजूला विषारी गॅस चेंबरची सोय केली गेली. त्यात ज्यूंची क्रुरपणे हत्या केली होती.

फ्रान्सला जर्मनीची स्पर्धा होती. या स्पर्धेत फ्रेंचांना जर्मन लोकांना कसे थांबवायचे हे माहिती होते. त्याविरोधात रेनॉल्ट आणि प्यूजिओने कट रचला, पोर्शे आणि त्याचा जावई अँटोन पिच या दोघांवर युद्ध गुन्ह्यांमध्ये भाग घेतल्याचा आरोप होता. बीटल कारला जागतिक यश मिळवून देऊनही, पोर्शेला फ्रेंच लष्करी अधिकाऱ्यांनी डिसेंबर 1945 मध्ये अचानक ताब्यात घेतले. त्यांना ऑगस्ट 1947 पर्यंत तुरुंगात ठेवले.

हिटलर आणि पोर्श यांची मैत्री असली तरी काही उपयोग झाला नाही. हुकूमशहा मोठ्या प्रकल्पांसाठी बिगर राजकीय व्यक्तींना प्रलोभीत करू शकतात. अमर्यादित संधीसाधूपणा केल्यावर नैतिक विचार बाजूला ठेवणारा पोर्श काही एकमेव नव्हता. केवळ त्यांच्या कंपनीच्या यशात किंवा महत्त्वाकांक्षी तांत्रिक प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात स्वारस्य असणाऱ्या व्यावसायिक नेत्यांना अनेकदा सैतानाशी देखील व्यवहार करण्यात कोणतीही अडचण नसते असे प्राध्यापक वोल्फ्राम पायटा यांनी म्हटले आहे.

10 millionth Beetal car

10 millionth Beetal car

बीटल कार जर्मनीचा ब्रॅंड बनली

लोकांसाठी छोट्या कार बनविण्याला जागतिक महायुद्धानंतरच सुरूवात झाली. नाझी काळाचे सावट पुसून काढण्यासाठी या कारला “बीटल” असे नाव दिले गेले. पहिला डिसेंबर 1945 मध्ये दहा वर्षांनंतर 10 लाखावी कार कारखान्यातून बाहेर पडली. बॉक्सर इंजिन असलेली हॅचबॅक कार जर्मनीसाठी आर्थिक चमत्कार आणि जागतिक यशाचे प्रतीक बनली. एकूण 22 दशलक्ष बीटल कार तयार करण्यात आल्या आणि विकल्या गेल्या. युद्धानंतर लगेचच बीटल कंपनीने आपला नाझी भूतकाळ झटकून मागे टाकला. उल्लेखनीय म्हणजे, फ्रान्सच्या समाजवादी नेतृत्वाखालील औद्योगिक उत्पादन मंत्रालयाने ऑक्टोबर 1945 मध्ये पोर्शशी संपर्क साधला. पुढे 30 जुलै 2003 मध्ये शेवटचे बीटल कारचे मॉडेल मेक्सिको येथे तयार करण्यात आले.

HITLER march

HITLER march

हिटलर सैन्यात भरती झाला

हिटलर साल 1913 मध्ये म्युनिख प्रातांत गेला. तेव्हा पहिले जागतिक महायुद्ध सुरु झाले होते. त्यामुळे त्याने बवेरियन राजाच्या पायदळात स्वयंसेवक म्हणून प्रवेश मिळविला. ऑक्टोबर 1914 मध्ये हिटलर बेल्जिएममध्ये तैनात झाला. त्याला युद्धातील चांगल्या कामगिरीमुळे दोन सैनिक पदके देखील मिळाली. ज्यात ‘आयरन क्रॉस फर्स्ट क्लास’ चा देखील समावेश होता. त्याने या पुरस्काराचे चिन्ह जीवनाच्या शेवटपर्यंत आपल्या वर्दीवर मिरविले. पहिल्या जागतिक महायुद्धात जर्मनीच्या पराभवाला ज्यू लोकांना दोषी ठरविले. त्यानंतर त्यान 1918 मध्ये स्वत:च्या नाझी पक्षांची स्थापना केली. त्यानंतर त्याने ज्यू लोकांचा तिरस्कार करुन त्यांच्या विरोधात जनमत कलुषित केले. त्यांनी ज्यूंना जर्मनीसाठी अभिशाप असल्याचा आरोप केला. त्याने अत्यंत क्रूरपणे ज्यू लोकांची शिरकाण केले.

आर्य वंश आणि ज्यूंची हत्या

ज्यूंना संपवून हिटलर आपला आर्य वंश शुद्ध करायचा होता. ज्यूंच्या पुरुषांना त्यांनी गॅस चेंबरमध्ये कोंडून, गोळ्या घालून मारले. तर महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र छळछावण्या तयार केल्या. या द्वेषाच्या पेरणीमुळे जवळपास 60 लाख ज्यू नागरिकांची हत्या करण्यात आली. साल 1923 मध्ये हिटलरने आपल्या नाझी पक्षांच्या मदतीने जर्मनीचे तत्कालिन सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला अपयश आले. त्यामुळे हिटलरवर गुन्हा दाखल होऊ शिक्षा झाली. त्यामुळे हिटलरसा निवांत वेळ मिळाल्याने त्याने तुरंगात आपले आत्मचरित्र लिहीले. ( Mein Kampf ) ‘माझा संघर्ष’ असे त्याचे नाव आहे. हा हिटलरचा जाहीरनामा मानला जातो. या आत्मकथेत त्याने नाझी पक्षांचे सिद्धांत मांडले होते. हिटलरला हे पुस्तक जर्मनीतील प्रत्येक नवदाम्पत्याला भेट दिले होते.

नाझी पक्षांची ताकद वाढविली

साल 1932 पर्यंत जर्मनीच्या संसदेत नाझी पक्षाच्या सदस्यांची संख्या 230 इतकी झाली होती. सन 1933 मध्ये चान्सलर बनल्यानंतर हिटलरने जर्मन संसद भंग केली. तसेच साम्यवादी पक्षाला बेकायदेशीर ठरवून त्याच्या बंदी आणली. हिटलरने 1933 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्यत्व सोडून दिले. आणि भविष्यातील युद्धाची तयारी करण्यासाठी जर्मन सैनिकांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली.

दुसऱ्या जागतिक महायुद्धाची ठिणगी

1937 साल जर्मनीने इटलीसोबत करार केला. त्यानंतर त्याचवर्षी ऑस्ट्रीयावर ताबा मिळविला.हिटलरच्या राक्षसी विस्तारवादी धोरणांमुळे हिटलरच्या सैन्याने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला. त्यामुळे ब्रिटनने पोलंडच्या संरक्षणासाठी आपले सैन्य पाठविले आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला.

hitler and Benito Mussolini

hitler and Benito Mussolini

दोन हुकूमशहांचा अंत

हिटलरच्या नेतृत्वाखाली साल 1941 पर्यंत नाझी सैन्याने युरोपवर कब्जा केला. हिटलरने सर्व शेजारील देशांशी वैर पत्करले. त्यानंतर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीचा पराभव केला. 77 वर्षांपूर्वी 28 एप्रिल, 1945 रोजी इटलीचा फॅसिस्ट हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी आणि त्याची प्रेयसी क्लारेटा पेटाची यांची नागरिकांनी गोळ्या घालून हत्या केली. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला जर मी युद्धाच्या मैदानातून पळालो तर मला भरचौकात गोळ्या घाला अशी मुसोलिनी याने केलेली घोषणा प्रचंड गाजली होती. परंतू युद्धात दोस्त राष्ट्रांकडून इटलीचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या या आवाहनाचे तंतोतंत पालन करीत त्यांना गोळ्या घातल्या.

मुसोलिनी गेल्याचे कळले अन्…

युद्धात मोठा पराभव झाल्यानंतर मुसोलिनी आणि त्यांची प्रेयसी क्लारेटा उत्तरेत स्वित्झर्लंडच्या सीमेच्या दिशेने चालले होते. डोगों परिसरात त्यांचे विरोधक ज्यांना ‘पार्टीजन’ असे म्हटले जाते. त्यांनी कोणताही खटला न चालविता या दाम्पत्याला आणि त्यांच्या 16 साथीदारांना कोमो तलावाजवळ गोळ्या घातल्या. त्यानंतर नागरिकांनी मुसोलिनीचा देह उलटा लटकवला. मुसोलिनीचा अंत असा झाल्याचे ऐकून जर्मनीचा हुकूमशहा हिटलर आणि त्याच्या प्रेयसीने 50 फूट खोल बंकरमध्ये लपले. सोव्हीएत सैन्यांनी घेरल्यानंतर 30 एप्रिल 1945 रोजी हिटलरने जर्मनीतील बर्लिनमध्ये जमीनीखालील 50 फूट खोल बंकरमध्ये स्वत:ला गोळी मारुन त्याची पत्नी इवा ब्राऊन हिच्या सोबत आत्महत्या केली.

हिटलरची आत्मकथा

ॲडॉल्फ हिटलर आपल्या ‘माईन काम्फ ‘ ( Mein Kampf ) या आत्मचरित्रात्मक ग्रंथात राजकीय जाहीरनामाच जाहीर केला होता. हे त्यांचे एकमेव पूर्ण पुस्तक होते आणि ते पुस्तक जर्मनीच्या थर्ड रीचमधील राष्ट्रीय समाजवादाचे ( नाझीझम ) बायबल बनले. हे पुस्तक 1925 आणि 1927 मध्ये दोन खंडांमध्ये प्रकाशित झाले आणि 1930 मध्ये त्याची एक संक्षिप्त आवृत्ती प्रकाशित झाली. 1939 पर्यंत त्याच्या 5,200,000 प्रती विकल्या गेल्या आणि 11 भाषांमध्ये अनुवादित केले गेले आहे. या पुस्तकावर बंदी देखील आली होती. जर्मनीत त्या काळात प्रत्येक जोडप्याला हे पुस्तक हिटलर भेट देत असे.

Non Stop LIVE Update
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत.
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?.
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल.