GK : फेवीक्विकने दोन बोटंही चिकटतात, मग ते ट्यूबच्या आत तसंच कसं राहतं? जाणून घ्या कारण

फेवीक्विक आपण आपल्या घरातील छोट्यामोठ्या वस्तू चिकटवण्यासाठी वापरतो. त्यामुळे त्याचा परिचय आपल्याला आहे. पण हे फेवीक्विक रसायन ट्यूबच्या आत मात्र सुरक्षित असतं आणि बाहेर पडताच दगड होतं. असं कसं होतं ते जाणून घ्या.

GK : फेवीक्विकने दोन बोटंही चिकटतात, मग ते ट्यूबच्या आत तसंच कसं राहतं? जाणून घ्या कारण
GK : फेवीक्विकने दोन बोटंही चिकटतात, मग ते ट्यूबच्या आत तसंच कसं राहतं? जाणून घ्या कारण
Image Credit source: TV9 Network/File
| Updated on: Jun 19, 2026 | 6:32 PM

घरातील तुटक्या फुटक्या वस्तू जोडण्यासाठी काय पाहीजे? असं म्हंटलं तर तुम्ही पटकन फेवीक्विक हे नाव घ्याल. कारण जाहिरातीचा प्रभाव आपल्या डोक्यात वर्षानुवर्षे राहिला आहे. त्यामुळे बारीकसारीक गोष्टी चिकटवण्यासाठी फेवीक्विकचा वापर केला जातो. पण हे फेवीक्विक वापरताना तितकीच काळजी घ्यावी लागते. कारण ते एकदा एखाद्या वस्तूला चिकटलं तर सहजासहजी निघत नाही. त्यामुळे त्वचेला लागू नये याची काळजी घ्यावी लागते. कधी कधी चुकून बोटाला किंवा त्वचेला फेवीक्विक अनावधानाने लागतो. त्यामुळे मनाला हुरहूर लागून लागते. कारण हा फेवीक्विक सहजासहजी निघत नाही. पाण्याखाली बोट ठेवलं तरी खरखरीतपणा जाणवतो. कधी कधी फेवीक्विक लागलेल्या जागेवर चुरचुरतं. त्यामुळे फेवीक्विक वापरताना काळजी घेतलेली बरी.. पण असं असताना तुम्ही कधी विचार केला आहे का? फेवीक्विक ट्यूबच्या आत मात्र सुरक्षित असतो. तो त्या ट्यूबला आतून चिकटत नाही. यामागे नेमकं काय कारण ते समजून घेऊयात..

फेवीक्विक पटकन चिकटण्याची क्रिया ही काय अशीच होत नाही. तर त्यात सायनोएक्रायलेट नावाचं रसायन असल्याने होते. या रसायनामुळे फेवीक्विकला चिकटण्याची खरी शक्ती मिळते. कारण गम किंवा चिकटवण्याचे साहित्य वापरलं तरी ते सुकण्यासाठी काही तास वाट पाहावी लागते. पण फेवीक्विकच्या बाबतीत तसं नाही. लावलं की काही सेकंदात ते चिकटून जातं. त्याला सायनोएक्रायलेट हे रसायन कारणीभूत आहे. हे रसायन किंचितशा ओलाव्यात काम करून जातं. जरासा ओलावा लागला की ते सक्रिय होत आणि घट्ट होतं. त्याचा प्लास्टिकसारखा बंध तयार होतो. पण शक्तिशाली रसायन यात असताना ट्यूबमध्ये चिकटत नसल्याने आश्चर्य तर वाटणारच ना…

फेवीक्विक ट्यूबमध्ये न चिकटण्याचं कारण म्हणजे त्या ट्यूबचं पॅकेजिंग आणि हवाबंद तंत्र… हा द्रव कारखान्यात ट्यूबमध्ये भरला जातो. कारखान्यात हा द्रव भरला जातो त्या ठिकाणी वातावरणात ओलावा नसतो. तसेच ट्यूबमध्ये पाणी किंवा हवा राहणार नाही याची काळजी घेतली जाते. सायनोएक्रायलेट रसायनचा हवा किंवा ओलाव्याशी संबंध येत नाही, तेव्हा त्याची चिकटण्याची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे अनेक दिवस घरात किंवा दुकानात फेवीक्विक सुरक्षित राहतो. पण एकदा का फेवीक्विक तुम्ही वापरला आणि त्याचं झाकण व्यवस्थित लावलं नाही तर ते ट्यूबच्या आत दगडासारखं होतं. कारण सायनोएक्रायलेट या रसायनाला एकदा का हवा किंवा ओलावा लागला तर त्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे ट्यूबचं झाकण घट्ट बंद करावं लागलं.

Follow Us