AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम

Onion Price Hike : कांद्याच्या किंमती भडकल्या आहेत. कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तर 50 किलो कांदा एकदाच खरेदी केल्यास पोलीस तो जप्त करू शकते का? तो उचलून घेऊन जाणार का?

काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम
कांद्याची दरवाढ
| Updated on: Aug 25, 2026 | 2:38 PM
Share

Onion Stock Limit: संपूर्ण देशात कांद्याच्या किंमती भडकल्या आहेत. केवळ एका आठवड्यात जवळपास 17 टक्क्यांनी किंमती वाढल्या. अनेक राज्यात साधारण किरकोळ किंमत 50 रुपये प्रति किलोग्रॅमहून अधिक झाली आहे. यामुळे कांद्याची वाजवी पेक्षा अधिक खरेदी, तो जमा करून ठेवल्यास ती साठेबाजी मानली जाईल का? पोलीस कारवाई करतील का? 50 किलो कांदा एकदाच खरेदी केल्यास पोलीस तो जप्त करू शकते का? तो उचलून घेऊन जाणार का? काय सांगतो याविषयीचा नियम?

सर्वसामान्य ग्राहकांना कोणतीही अडचण नाही

जर एखादी व्यक्ती घरगुती वापरासाठी, लग्न, सणासुदीसाठी, कौटुंबिक कार्यक्रमासाठी 50 किलो कांदा खरेदी करत असेल तर कोणतीही कार्यवाही होणार नाही. कारण त्याच्यांसाठी स्टॉक लिमिट लागू नाही. घरात दोन ते तीन पतोडी कांदा ठेवणे म्हणजे साठेबाजी म्हणता येत नाही. स्टॉक लिमिट ही व्यापाऱ्यांसाठी लागू आहे. व्यावसायिक वापरासाठी कांद्याचा भरमसाठ साठा जमा करणे, कृत्रिम साठेबाजी करणे यामुळे बाजारात कांदा मुबलक प्रमाणात दाखल होत नाही. परिणामी महागाई वाढते. दर वाढतात. या गोष्टींना आळा घालण्यासाठी कांद्याच्या साठेबाजीविरोधात सरकार कारवाई करणार आहे. पण घरगुती ग्राहकांच्या घरात इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक करण्यात येत नाही. शेतकरी सुद्धा त्यांच्या चाळीत एका मर्यादेपेक्षा कांदा साठवत नाहीत.

व्यापाऱ्यांना साठा मर्यादा लागू

जेव्हा कांद्याच्या किंमतीत मोठी वाढ होते. तेव्हा सरकार अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत मोठ्या प्रमाणात साठेबाजी करण्यास मज्जाव करतो. वस्तू साठा मर्यादा लागू होते. साठेबाजांवर कारवाई करण्यासाठी आणि नफाखोरी टाळण्यासाठी या कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येते. बाजारातील सध्याची स्थिती आणि सरकारी आदेशानुसार ठोक व्यापारी अनेक टनापर्यंत साठवणूक करू शकत नाहीत. किरकोळ विक्रेत्यांसाठी ही मर्यादा कमी असते.

पोलीस 50 किलो कांदा जप्त करू शकते?

केवळ घरगुती वापरासाठी 50 किलो कांदा खरेदी केल्याने तो जप्त करण्याला कोणताही कायदेशीर आधार मिळत नाही. घरगुती वापरासाठी एकदाच कांदा खरेदी करता येते. पण व्यावसायिक, व्यापारी वापरासाठी स्टॉक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक प्रमाणात कांदा साठवणूक असल्यास छापा मारून स्टॉक जप्त केल्या जाऊ शकतो. सरकारही किंमती वाढल्यावर बपर स्टॉक बाजारात उतरवते.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...