AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं

Abhijeet Dipke On Best PM : देशातील आतापर्यंतचे सर्वोत्तम पंतप्रधान कोण याचे वेधक उत्तर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिले आहे. त्यांनी आवडता मुख्यमंत्री कोण आहे, त्याचे नावही सांगितले.

भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं
अभिजीत दिपके, नरेंद्र मोदी
| Updated on: Aug 24, 2026 | 10:40 PM
Share

क्रॉकोच जनता पार्टीचे (Cockroach Janta Party) संस्थापक अभिजीत दिपके यांनी एका खास प्रश्नाचे वेधक उत्तर दिले. देशातील आतापर्यंतचा सर्वोत्तम पंतप्रधान कोण असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वोत्तम पीएम असल्याचे उत्तर दिपके यांनी दिले. त्यावर सीजेपीचे आशुतोष रांका यांनी हे उत्तर योग्य असल्याचे म्हटले. सौरव दास यांनी सुद्धा या मताला दुजोरा दिला. एका कार्यक्रमात या तीनही नेत्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे. ते सर्वात कुलेस्ट पंतप्रधान असल्याचे दीपके म्हणाले. दीपके हे दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनामुळे भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता.

आवडता मुख्यमंत्री कोण?

सर्वोत्तम पंतप्रधान कोण याचे उत्तर दिल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आवडत्या मुख्यमंत्र्यांचे नावही सांगून टाकले. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, केरळचे माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची नावं दिपके यांनी जोडले. स्टॅलिन यांना अर्थशास्त्राची चांगली माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. पिनराई विजयन यांच्या केरळमधील हेल्थ मॉडलचे त्यांनी कौतुक केले. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत शाळा आणि आरोग्य विषयात चांगले काम केल्याचे त्यांनी सांगितले.

5 सप्टेंबर रोजी दिल्लीत सीजेपी आंदोलन

5 सप्टेंबर रोजी दिल्लीत सीजेपी आंदोलन करणार आहे. त्याची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. देशातील शाळांची आणि शिक्षणाची बिकट अवस्था, मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव, ग्रामीण भागासह प्रशासकीय उदासिनता यावर भाष्य करण्यात येणार आहे. तर 25 जुलै रोजी केंद्र सरकारने जी काही आश्वासनं दिली होती. त्यातील एकही आश्वासन पाळलं नसल्याची टीकाही सीजेपीने केली आहे. या सर्वांचा जाबही पक्ष विचारणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिक्षणातील सुधारणांसाठी सीजेपीने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात दिल्लीत पुन्हा आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी