
Aurangzeb History: मुगल बादशाह औरंगजेब याचे गुणगान करुन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी वादात अडकले आहे. अबू आझमी यांना विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमींना उत्तर प्रदेशात पाठवा, त्यांचा चांगला उपचार करु, या शब्दांत फटकारले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपटामुळे औरंगजेबची क्रूरता आजच्या पिढीपर्यंतही आली. औरंगजेब किती निर्दयी, निष्ठुर, हिंसक, अमानुष होता ते पडद्यावर पाहून चित्रपट पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे येत आहेत. औरंगजेबचा इतिहास वाचल्यावर क्रूर शब्दही त्याच्यापुढे खूप खुजा ठरतो. शाहजहान यांना कारागृहात टाकले पाचवा मुगल बादशाह शाहजहान याला चार मुले होती. त्यात दारा शिकोह, शाहशुजा, औरंगजेब आणि मुराद बख्श. औरंगजेबाचे पूर्ण नाव अबुल मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब होते. त्याचा जन्म 4 नोव्हेंबर 1618 रोजी गुजरातमधील दोहाड येथे झाला. औरंगजेब हा शाहजहान आणि मुमताज यांचा...