AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’ इतिहास रचणार, ‘शोले’ आणि ‘मुगल-ए-आजम’चा रेकॉर्ड मोडणार, चित्रपट पाहून या दिग्दर्शकाचं मोठं विधान

भारतातील सर्वात फ्लॉप दिग्दर्शकाने 'धुरंधर 2' बघितल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया प्रचंड चर्चेत आली आहे. त्यांनी म्हटले की, धुरंधर हा चित्रपट 'शोले' आणि 'मुगल-ए-आजम' पेक्षा 100 पट अधिक खास आहे.

'धुरंधर 2' इतिहास रचणार, 'शोले' आणि 'मुगल-ए-आजम'चा रेकॉर्ड मोडणार, चित्रपट पाहून या दिग्दर्शकाचं मोठं विधान
| Updated on: Mar 18, 2026 | 11:20 AM
Share

Dhurandhar 2 : 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर धुरंधरचा दुसरा भाग 19 मार्च रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत असून, रिलीजपूर्वीच या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या क्रेझमुळेच निर्मात्यांनी 18 मार्चपासून या चित्रपटाचे स्पेशल पेड प्रीव्ह्यू शो सुरू केले आहेत.

चित्रपट अधिकृतरीत्या प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक सेलिब्रिटींनी तो पाहिला असून, सोशल मीडियावर त्यांचे रिव्ह्यू व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाचे जोरदार कौतुक केले आहे.

राम गोपाल वर्मांकडून चित्रपटाचं कौतुक

राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना ‘धुरंधर 2’ ला एका नव्या चित्रपट युगाची सुरुवात असे म्हटले आहे. त्यांनी या चित्रपटाच्या संभाव्य कमाईपासून ते प्रेक्षकांच्या प्रतिसादापर्यंत तसेच त्याच्या सामाजिक प्रभाव आणि सिनेमातील नवे प्रयोग यांचे मोठ्या शब्दांत वर्णन केले.

त्यांच्या मते, हा चित्रपट शोले पेक्षा 100 पट भव्य ठरेल आणि मुगल-ए-आजम पासून आजवर बनलेल्या सर्व महान चित्रपटांना मागे टाकेल. इतकेच नाही तर त्यांनी असेही म्हटले की या चित्रपटानंतर पूर्वीचे चित्रपट टीव्ही सिरियलसारखे वाटतील.

राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शक आदित्य धर यांचे विशेष कौतुक करताना असेही म्हटले की दिग्दर्शक या शब्दाची स्पेलिंगही आता आदित्य धर यांच्या नावाने सुरू होईल. तसेच त्यांनी जागतिक स्तरावरील दिग्गज दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग आणि क्रिस्टोफर नोलन यांनाही हा चित्रपट पहिल्याच दिवशी पाहण्याचा सल्ला दिला.

प्रेक्षकांच्या प्रतिसादाची उत्सुकता

जरी चित्रपटाला सेलिब्रिटींकडून मोठे कौतुक मिळत असले तरी खरा निर्णय प्रेक्षकांच्या हातात असणार आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला नेमका कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, चित्रपटाच्या गाण्याच्या लॉन्चदरम्यान साराने खरे ‘धुरंधर’ म्हणजे प्रेक्षकच असे सांगत प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले.

‘धुरंधर 2’ या चित्रपटाने रिलीजपूर्वीच मोठी चर्चा निर्माण केली आहे. आता बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट किती यशस्वी ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?