घानाकडे इतके सोने आले कसे? ज्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचले

सोन्याच्या उत्खननासाठी घाना सरकारने आपले धोरण सोपे बनवले आहे. उत्खनन करणाऱ्या कंपन्या सोने काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. विशिष्ट पद्धतीने सोन्याचे उत्खनन केले जाते.

घानाकडे इतके सोने आले कसे? ज्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचले
घानामध्ये सोन्याच्या अनेक खाणी.
| Updated on: Jul 03, 2025 | 10:19 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम आफ्रिकेतील देश घाना येथील दौऱ्यावर आहे. घाना आफ्रिकेतील सर्वात मोठा सोना उत्पादक देश आहे. जगभरात सोने उत्पादनात हा देश सहाव्या क्रमांकावर आहे. बेकायदेशीर सोन्याचे उत्खनन थांबवण्यासाठीही हा देश संघर्षही करत आहे. यासाठी लष्करी कारवायाही केल्या जात आहेत. घानाला गोल्ड कोस्ट असेही म्हटले जाते. भारतासह अनेक देश घानाकडून सोने खरेदी करते.

खनिजांचा विशाल भंडार

घानात अनेक दशकांपासून सोन्याचे उत्खनन होत आहे. सोने या देशातील अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र बनले आहे. घानाकडे इतके सोने आले तरी कसे? हा प्रश्न अनेकांना पडतो. घाना आफ्रिकेतील पश्चिम क्रॅटन प्रदेशात आहे. हा परिसर त्याच्या अब्जावधी वर्षे जुन्या खडकांसाठी ओळखला जातो. त्यामध्ये खनिजांचा विशाल भंडार आहे. त्यातील काही खडक असे आहेत, ज्यांना बिर्मियन ग्रीनस्टोन बेल्ट म्हटले जाते. ते सोन्यासाठी प्रसिद्ध आहेत. प्राचीन काळापासून ज्वालामुखी आणि गरम द्रव जमिनीत पसरत आहेत आणि त्यांचे क्षेत्रफळ वाढवत आहेत. या द्रव्यात सोने विरघळलेले असते. ते हळूहळू खडकांमध्ये जमा होत होते. कालांतराने खडक वर येतात आणि वरचा भाग क्षीण होत राहतो. परिणामी सोने नद्या आणि किनाऱ्यांवर पोहोचते. येथून सोने दऱ्या आणि वाळूमध्ये जमा होते. याला प्लेसर गोल्ड म्हणतात. त्याचे उत्खनन केले जाते. पश्चिमी भागातील तारक्वा आणि दमांग या भागात मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खदानी आहेत.

सोने कसे काढतात?

सोन्याच्या उत्खननासाठी घाना सरकारने आपले धोरण सोपे बनवले आहे. उत्खनन करणाऱ्या कंपन्या सोने काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. विशिष्ट पद्धतीने सोन्याचे उत्खनन केले जाते. सोने असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मशनरींच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जाते. खडकांचे तुकडे केले जातात. त्यांना बारीक केले जाते. त्यानंतर वेगवेगळ्या रसायनांचा वापर करुन सोने शुद्ध करण्याची प्रक्रिया केली जाते. त्याचा विटा तयार केल्या जातात.

घाना जगातील अनेक देशांमध्ये सोने निर्यात करतो. त्यात भारताचाही समावेश आहे. प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका हे देशही घानाकडून सोने घेतात. तसेच घाना इतर काही देशांमध्येही सोने निर्यात करतो. परंतु ते अत्यंत मर्यादित आहेत.