
आजच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो. लहान मोठे, तरूण, सगळे जण मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात, कोणी गेम खेळतं, तर कोणी सोशल मीडियावर मग्न असतं. पण प्रत्येक जण मोबाईल हा वापरतोच. पण जो मोबाईल तुम्ही 10 हजार किंवा 50 हजार रुपयांमध्ये विकत घेता, त्यावर दुकानादाराला किती नफा (Margin) मिळतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? याबद्दलची माहिती ऐकल्यावर तुम्ही हैराण व्हाल
वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवर वेगवेगळा नफा
10 हजारांचा फोन – दुकानदाराला साधारण 1200-1300 (Samsung वर) आणि इतर ब्रँड्सवर 300 ते 800 रुपयांचा नफा मिळतो.
20 हजारांचा फोन – 1500-2000 रुपयांपर्यंत
30 हजारांचा फोन – 2500-3000 नफा
40 हजारांचा फोन – 3500-4500 रुपयांपर्यंत नफा
50 हजारांचा फोन – साधारण 5000 तके 6000 नफा मिळतो.
iPhone वर किती मिळतं मार्जिन ?
1 लाख रुपयांपर्यंतचे फोन (उदा – iPhone 15 Pro Max) – तिथे मार्जिन फक्त 4-5 % आहे, म्हणजे सुमारे 4000 ते 5000 रुपये इतकं मिळतं.
फोन घेताना ग्राहक कोणती गोष्ट पाहतात ?
महिला – बहुतांश महिला या कोणताही फोन घेताना कॅमेरा क्वॉलिटी आणि लुक्स पहिले पाहतात.
तर पुरूष – पुरूष हे बॅटरी आणि फोनचा परफॉर्मन्स चेक करतात.
तरूण वर्ग- आजकालची रूण पिढी ही प्रोसेसर, RAM आणि इंटर्नल मेमरी चेक करतात.
दुकानदाराला सर्वात जास्त नुकसान कधी होतं ?
जेव्हा Flipkart, Amazon सारख्या साइट्सवर सेल असतो तेव्हा ऑफलाइन दुकानदारांना किंमत जुळवावी, प्राईस मॅच करावी लागते. अशा परिस्थितीत, मार्जिन खूप कमी होते, कधीकधी ते 50 % पर्यंत घसरते. त्यामुळे नुकसान होऊ शकते.
सर्वात जास्त फोन कधी विकले जातात ?
दिवाळी, दसरा, ईद यासारख्या सणांच्या काळात बहुतेक फोन विकले जातात. 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) आणि 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) या दिवशी स्पेशल सेल डे आयोजित केले जातात.
प्रत्येक दुकानात वेगवेगळे भाव का असतात ?
मोठी रिटेल स्टोअर्स (Croma, Vijay Sales, Reliance Digital) ही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अतिरिक्त सवलती म्हणजेच एक्स्ट्रॉ डिस्काऊंट देतात. कधीकधी स्थानिक डीलर्स ग्राहकांना त्यांचे नफा कमी करून स्वस्त फोन विकतात. शेवटी, ग्राहक त्याच दुकानदाराकडे जातो, जो त्यांना चांगला डिस्काउंट + ऑफर देतो.