Hotel Safety : हॉटेलमधील या 3 जागा अतिशय धोकादायक, गुपचूप सगळे क्षण होतात रेकॉर्ड, दुर्लक्ष केल्यास मोठा पश्चात्ताप!

हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये तुम्ही मुक्काम करणार असाल किंवा काही तासांसाठी राहणार असाल तर काही बाबींची काळजी घेणं गरजेचं आहे. हॉटेलच्या काही जागांवर छुपे कॅमेरे लावलेले असू शकतात.

Hotel Safety : हॉटेलमधील या 3 जागा अतिशय धोकादायक, गुपचूप सगळे क्षण होतात रेकॉर्ड, दुर्लक्ष केल्यास मोठा पश्चात्ताप!
hotel hidden camera
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 6:43 PM

Hotel Hidden Camera : फिरायला गेल्यानंतर किंवा एखाद्या ठिकाणी आपण महत्त्वाची मिटिंग अटेंड करायला गेल्यानंतर आपण मुक्कामासाठी एखाद्या हॉटेलची निवड करतो. परंतु आजकाल हॉटेलमधील खासगी व्हिडीओ, फोटो व्हायरल होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळेच हॉटेलमध्ये मुक्काम करावा की नाही, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. अनेक हॉटेलचे मालक आमच्या हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्यांंचं खासगी आयुष्य जपलं जातं, असा दावा केला जातो. परंतु तरीही अनेक लोकांचे प्रायव्हेट व्हिडीओ बाहेर आल्याचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये राहायचे असेल तर काय काळजी घ्यावी, असे नेहमी विचारले जाते. म्हणूनच हॉटेलच्या रुममध्ये पाय ठेवताच काय चेक करायला हवं, काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊ या….

छुपे कॅमेरे तुम्हाला पाहतायत, काळजी घ्या?

हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये तुम्ही मुक्काम करणार असाल किंवा काही तासांसाठी राहणार असाल तर काही बाबींची काळजी घेणं गरजेचं आहे. हॉटेलच्या काही जागांवर छुपे कॅमेरे लावलेले असू शकतात. दरवाजावर लावलेले घड्याळ कॅमेरे लपवण्याचे सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. छोटासा छुपा कॅमेरा घड्याळात लपवला जाऊ शकतो. म्हणूनच तुम्ही घड्याळाची अगोदर तपासणी करा. तुमच्या रुममध्ये मच्छर पळवून लावण्यासाठी एखादी मशीन लावलेली असेल तर त्याचीही तपासणी करा.

Loading...

काय काय चेक करावं? कोणते नियम पाळावेत?

तुमच्या बेडच्या बाजूला एखादे डिजिटल घड्याळ ठेवलेले असेल तर त्याच्यामध्येही एखादा छोटा कॅमेरा तर लपवून ठेवलेले नाही ना? याची खात्री करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यावर अगोदर लाईट बंद करा आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलमधील टॉर्च सुरू करून संपूर्ण रुममध्ये तपासणी करा. टॉर्चचा लाईट पडल्यावर कॅमेऱ्यातील लेन्स लगेच चमकते. निळा रंग दिसू लागतो. असं काही घडल्यास तत्काळ हॉटेलच्या व्यवस्थापकाशी बोला. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही हे नियम पाळले तर होणारा अनर्थ टाळता येऊ शकतो. यासह तुमच्यासोबत असे काही प्रकार घडू नयेत म्हणून राहण्यासाठी चांगले हॉटेल्स निवडा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us