Soft Roti: चपात्या तव्यावरून काढताच कडक किंवा वातड होतात? ना मिठ, ना पाणी कणिक मळतानाच ‘हे’ दोन पदार्थ मिसळा
सकाळी बनवलेल्या चपात्या दुपारपर्यंत वातड किंवा कडक होत असेल तर तुम्ही एक सोपी युक्ती वापरू शकता. या युक्तीने तुमच्या सकाळी बनवलेल्या चपात्या संध्याकाळपर्यंत कापसासारख्या मऊ राहतील.

चपाती नरम राहाव्यात म्हणून कित्येक जण खूप तेल टाकून भरपूर वेळ कणिक मळतात पण तरी काही तासानंतर चपाती कडक होतात, पण चपातीचं कणिक मळताना फक्त भरपूर तेल वापरून फायदा नाही तर कणिक मळताना आणखी एक गोष्ट करायला हवी, बहुतेकांना ती गोष्ट माहितच नाही. ही गोष्ट केल्याने चपाती संध्याकाळपर्यंत कापसासारख्या मुलायम राहतील.

लोक कणिक मळण्यासाठी पाण्याचा बहुदा वापर करतात. जर तुम्हाला तुमच्या पोळ्या जास्त वेळ मऊ ठेवायच्या असतील तर कणिक मळताना पाण्यात थोडं दूध घालू शकता. दुधातील नैसर्गिक फॅट आणि प्रोटिन्स पिठाचा पोत सुधारण्यास मदत करतात. यामुळे चपात्या अधिक मऊ होतात आणि त्या कोरड्या होण्याची शक्यता कमी असते.

कणिक मळताना सुरुवातीला कणिक थोडे दूध आणि पाणी घाला. नंतर त्याला व्यवस्थित मळा. कणिक जास्त घट्ट किंवा जास्त सैल झालं नाही पाहिजे. व्यवस्थित मळून झाले की ते झाकून ठेवा. 15 ते 20 मिनिटे छान मुरू द्या. यामुळे कणिक छान होते आणि चपात्या अधिक हलक्या, मऊ होतात.

चपात्या बनवल्यानंतर लगेचच एका स्वच्छ कापडात किंवा डब्यात ठेवा. जर तुम्हाला त्या जास्त काळ ठेवायच्या असतील, तर त्या झाकून ठेवा कारण मोकळ्या हवेत ठेवल्यास त्या लवकर सुकतात.