AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील कोस्टल रोडवर अपघात झाला आहे. गाड्यांची एकमेकांना टक्कर झाली असून आतमध्ये आग लागल्याचे वृत्त आहे. तेथे अनेक गाड्या अकडून पडल्या असून आगीमुळे धूरही येत आहे.

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ
कोस्टल रोड अपघात
| Updated on: Jul 15, 2026 | 1:43 PM
Share

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील कोस्टल रोडवर अपघात झाला आहे. गाड्यांची एकमेकांना टक्कर झाली असून एका गाडीला आतमध्ये आग लागल्याचे वृत्त आहे. तेथे अनेक गाड्या अकडून पडल्या असून आगीमुळे धूरही येत आहे. नरीमन पॉईंटवरून कोस्टल रोडच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. या घटनेचा एका व्हिडीओही समोर आला असून बोगद्याच्या आतमध्ये शेकडो गाड्या एकमेकांमागोमाग अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. अनेक जण आपापल्या गाड्यांमधून खाली उतरून, नेमकं काय झालं  हे जाणून घेण्याचा प्रयत्न करता दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोडच्या बोगद्यात एक दुर्घटना घडली. तेथे एका कारला आग लागली.  कोस्टल रोडवरून जाणाऱ्या धावत्या कारला अचानक आग लागल्याने मोठा गोंधळ माजला. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही.

कुठे झाली दुर्घटना ?

मुंबईतील अत्यंत महत्वाचा असा वाहतूक मार्ग म्हणजे कोस्टल रोड.  याच कोस्टल रोडलवर जिथे बोगदा सुरू होतो, त्याचा ठिकाणी हा दुर्दैवी अपघात झाला. या भीषण अपघातामुळे कोस्टल रोडवरून धावणाऱ्या जवळपास 450  ते 500 हून अधिक गाड्या या ठिकाणी अडकून पडल्या आहेत. या घटनेनंंतर पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात  आली, तसेच अग्निशमन दलाला, अँब्युलन्सलाही फोन करण्यात आला आहे.

ट्राफिक वुभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर तिथे यावं आणि बोगद्यात अडकलेल्या गाड्यांना मार्गदर्शन करून, त्यांना तिथून वेगळा मार्ग तयार करून द्यावा, अशी मागणी होत आहे.  तसेच अग्निशमन दलाला देखील त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आहे. लवकरात लवकर येईन त्यांनी गाड्यांना लागलेली आग विझवावी अशी मागणी करण्यात आली.

थोड्याच पोलिस तसेच ट्राफिक दलाचे अधिकारी, कर्मचारी तेथे दाखल आणि त्यांनी असून तिथे अडकलेल्या गाड्यांना मार्गदर्शन केलं. हळूहळू त्या गाड्या रिव्हर्स घेऊन बाहेर काढत मार्ग मोकळा केला गेला.  वरळी ते मरीन लाईन्स इथपर्यंत 11 किमीचा हा साधारण कोस्टल रोड आहे. दरम्यान कोस्टल रोडवर कारला झालेल्या अपघातामुळे पेडर रोड आणि भुलाभाई देसाई रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

लवकरात लवकर आमची सुटका करा

या ठिकाणी गाडीला आग लागल्यानंतर मागून येणाऱ्या गाड्यांना काही अंतरावर तिथे थांबवण्यात आलं. त्या पाठून येणाऱ्या गाड्यांची वाहतूकही सुरू होती, मात्र समोर एका कालने पेट घेतल्यामुळे शेकडो गाड्या तिथेच एकामागोमाग थांबल्या आणि अडकून पडल्या. गाड्या पुढे का जात नाहीयेत हे पाहण्यासाठी अनेक प्रवासी कारमधून खाली उतरले होते, मात्र कारला आग लागल्याचे पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. आमची इथून लवकरात लवकर सुटका करा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

कोस्टल रोड जो अंडरग्राऊंड बनवला आहे, त्याच्यामध्ये एका गाडीने पेट घेतलाय, कारला आग लागली आहे. सगळ्या गाड्या आतमध्ये अडकल्या आहेत. अनेक लोकांनी गाड्या सोडून पळ काढला आहे,  कृपा करून पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. कोस्टल रोड पूर्ण जाम झालाय आतमध्ये, आम्हाला इथून सोडवावं, अशी मागणी करत तिथे अडकलेल्या एका प्रवाशाने व्हिडीओ पोस्ट केला होता.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ