राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
राज्याच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकरच राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या संभाव्य फेरबदलात काही मंत्र्यांना विश्रांती मिळण्याची तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्री नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी चर्चा आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील आमदार सुनील शेळके यांचे नावही मंत्रिपदासाठी चर्चेत आले आहे.
याशिवाय विदर्भातील आमदार राजू नवघरे यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी यापूर्वी महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले होते. आता संभाव्य फेरबदलामुळे राज्याचे लक्ष मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या नियुक्त्यांकडे लागले आहे.
Published on: Jul 14, 2026 06:15 PM
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग