AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule: तू गप्पबस, तुला कळत नाही…; सुप्रिया सुळेंना शरद पवार सर्वांसमोर असं का म्हणाले?

Supriya Sule: नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या वेळी नेमकं काय झालं होतं हे देखील सांगितलं आहे.

Supriya Sule: तू गप्पबस, तुला कळत नाही...; सुप्रिया सुळेंना शरद पवार सर्वांसमोर असं का म्हणाले?
Supriya SuleImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 15, 2026 | 12:47 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सतत काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची बरीच चर्चा रंगली. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय घडलं होतं? याबाबत माहिती दिली आहे. मी लेक असल्याने त्यांच्यासोबत असते. ते ओव्हर इंडिपेंडट असतात. ते हात करून म्हटले तू गप्प बस. तुला कळत नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नेमकं काय घडलं?

पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार हे विधासभेत शिंदेंना भेटले तो योगायोगच होता. पवार साहेब चालत गेले. विधानसभेत. मी लेक असल्याने त्यांच्यासोबत असते. तुम्ही जास्त चालू नका, तुम्ही जाऊ नका असं म्हणत असते. ते ओव्हर इंडिपेंडट असतात. ते हात करून म्हटले तू गप्प बस. तुला कळत नाही. म्हणून ते चालत सुटले.

शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीविषयी

पुढे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, परत येताना काही आमदारांनी म्हटले बऱ्याच दिवसाने आले. आमच्याशी बोलायचं आहे. बाजूच्या रुममध्ये ते गेले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे ऑफिस फिक्स असते. बाकीच्यांच्या केबिन फिक्स नसतात. राजकीय आयुष्यात कोणतीच जागा फिक्स नसते. त्या भ्रमात मी नाही. चारपाच लोक भेटले. हा शिंदे साहेबांचा मोठेपणा. नाही तर बातमी कराल. चांगल्याला चांगले म्हटलं पाहिजे. शिंदे आले त्यांनी पवार साहेबांना बुके दिले आणि ते निघून गेले. त्यावर राऊत साहेब नाराज झाले. मी त्यांना फोन करून ते सांगितलं. त्यानंतर राऊत साहेबांनी नाराजी नसल्याचं सांगितलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, काल माझा ब्रेकफास्ट योगी आदित्यनाथ सोबत होता. लंच डिंपल यादवांसोबत होता. मग त्यांना का भेटला असा प्रश्न मला का नाही विचारत. आम्ही वन नेशन वन इलेक्शनसाठी मी योगींना भेटलो. डिंपल यादव आणि अखिलेश यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांना भेटलो. त्यामुळे कुणी कुणाला भेटलं तर कटकारस्थान असतं हे काढून टाका. जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन भेटले. नगराध्यक्षांच्या विषयावर बोलायला गेले. गाडीने गेले गाडीने आले. हुडी घालून गेले नाही. तिथे सुनील तटकरे आणि पटेल होते की नाही माहीत नाही. तसेच हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. त्यांच्या घरी कोण जातं आणि कोण नाही हे त्यांनाच माहीत. आमच्या पक्षाचे नेते ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते. ऑफिशियली गेले होते. परत आले. पुढच्या दरवाजाने गेले. परत आले.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक