‘माझ्या ओल्या केसांकडे पाहून..नाना मला म्हणायचे की, ‘अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने सर्व सांगितले
अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने सर्व स्तरातून प्रतिक्रीया आल्या. प्रत्येक व्यक्तीने नानांशी असलेला स्नेह आणि जिव्हाळा बोलून दाखवला. आता अभिनेत्री ममता कुलकर्णी हीने देखील आपला अनुभव कथन केला आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांचे नुकतेच त्यांच्या गोव्यातील घरी ते एकटेच असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नाना पाटेकर यांच्या अभिनय आणि व्यक्तीमत्वाचे चाहते आणि त्यांच्या सामाजिक जाणीवेचे अनेक जण भोक्ते आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मल्हार याने देखील नानांची तब्येत उत्तम होती. त्यांचा मृत्यू दुर्दैवी होता अशी प्रतिक्रिया दिली आहे. नानांचे समाजकार्य आपण पुढे सुरुच ठेवणार असल्याचे मल्हार याने म्हटले आहे. नानाच्या शोकसभेला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आणि आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. नानांच्या कृपेने अनेकांना नवीन आयुष्य मिळाले आहे. त्यांच्या ऋणातून उतराई कसे व्हायचं हे अनेकांना कळत नाहीए. अशात आता अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी नानांच्या बद्दल आपली प्रतिक्रीया दिलेली आहे.
अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याने कलाजगता सह सर्वसामान्य चाहत्यांनाही हादरा बसला आहे. नाना पाटेकर यांचा स्वभाव फटकळ आणि तितकाच प्रेमळ देखील होता. नानांच्या बद्दलचे अनुभव एकेकाळची आघाडीची अभिनेत्री असलेल्या ममता कुलकर्णी हीने व्यक्त केले आहेत. अभिनेत्री नानांबद्दलचे अनुभव सांगताना म्हणाली,की नाना आणि मी मुंबईतील लोखंडवाला परिसरातील एकाच ( शीतल छाया ) इमारतीत राहायचो. जेव्हा सकाळी ५.३० चे ६ वाजण्याच्या दरम्यान मी शुटींगसाठी बाहेर पडायची तेव्हा नाना इमारती खाली बॅडमिंटन खेळत असायचे. मला कामाला ओले केस घेऊन जाताना पाहून ते वडिलकीच्या नात्याने रागावायचे. म्हणायचे की ओले केस घेऊन बाहेर पडू नये. केस पुसून जात जा, नाही तर आजारी पडशील असा सल्ला ते मला द्यायचे असे ममता कुलकर्णी हीने म्हटले आहे.
ममता कुलकर्णी हीने प्रयागराज येथील महाकुंभच्या वेळी अचानक संन्यास घेतला त्यावेळी ती प्रचंड चर्चेत आली होती. त्यानंतर ती अलिकडे राजस्थानात एका चित्रपट महोत्सवात नृत्य करताना दिसली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. ममता कुलकर्णी हीने संन्यास घेतल्यानंतर अचानक पुन्हा बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्याचे संकेत दिले आहे. कुंभमेळ्यात किन्नर अखाड्याने तिला संन्यास दिला होता. त्यानंतर या आखड्याच्या किन्नर प्रमुखाला हटवण्यात आले होते. तसेच ममता कुलकर्णी हीचा संन्यासन हा दर्जा काढून टाकला होता.
