नानांची तब्येत उत्तम होती,पण दुर्दैवी घडले, नानाचा मुलगा मल्हार यांचे वक्तव्य…
अभिनेते नाना पाटेकर यांना पुन्हा शुन्यातून सुरुवात करायची होती.त्यांची तब्येत उत्तम होती. परंतू हार्ट अॅटक आल्याने दुर्दैवीपणे त्यांचे निधन झाल्याचे त्यांचा मुलगा मल्हार यांनी म्हटले आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर त्यांच्या पुणे येथील गावी डोणजेत शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांचा देह पंचत्वात विलीन झाला आहे. त्यांच्या चितेला त्यांचा पूत्र मल्हार यांनी अग्नि दिला आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना वडिलांबद्दल माहिती दिली, नानांची तब्येत उत्तम होती,पण दुर्दैवी घडले.त्यांचे नाम फाऊंडेशन आणि इतर संस्थाचे काम यापुढे सुरु राहिल असेही मल्हार यांनी म्हटले आहे.
अभिनेते नाना पाटेकर यांना पुन्हा शुन्यातून सुरुवात करायची होती.त्यांची तब्येत उत्तम होती. परंतू हार्ट अॅटक आल्याने दुर्दैवीपणे त्यांचे निधन झाल्याचे त्यांचा मुलगा मल्हार यांनी अंत्यसंस्कारानंतर म्हटले आहे. त्यांनी सर्व संस्थांचे काम वाटून दिले होते. जबाबदारी वाटून दिली होती. नाम फाऊंडेशन, निर्मला गजानन फाऊंडेशन या संस्थांद्वारे ५३ व्हर्टिकलमध्ये काश्मीरपर्यंत आम्ही काम करतो. आता पॅन इंडिया काम करायचे होते. त्यांना शुन्यातून सुरुवात करायची होती. सगळे चांगले होते. उत्तम तब्येत होती.पण दुर्दैवाने त्यांना हार्ट अॅटक आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे काम आम्ही पुढे सुरु ठेवू असेही ते म्हणाले.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
