AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्री वर्षा बंगल्यावर काय घडले? जयंत पाटलांनी सांगितला थेट सर्व घटनाक्रमच, देवेंद्र फडणवीस..

मध्यरात्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल अचानक वर्षा बंगल्यावर पोहोचले. ज्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

मध्यरात्री वर्षा बंगल्यावर काय घडले? जयंत पाटलांनी सांगितला थेट सर्व घटनाक्रमच, देवेंद्र फडणवीस..
Jayant Patil
| Updated on: Jul 15, 2026 | 11:44 AM
Share

काल मध्यरात्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल अचानक वर्षा बंगल्यावर पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ज्यानंतर शदर पवार यांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. राजकीय वर्तुळात विविध चर्चा या रंगताना दिसल्या. महाविकास आघाडीत फुट पडणार असल्याचे सांगितले जात होते. मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल आता जयंत पाटील यांनी मोठे विधान केले. नक्की वर्षा बंगल्यावर काय घडले, हे जयंत पाटील यांनी सांगितले. जयंत पाटील माध्यमांसोबत बोलताना म्हटले की, मी सीएमची वेळ घेतली. वेळ थोडी पुढे गेली. त्यांच्या केबिनमध्ये जाऊन चहा घेतली. सीएम आले. त्यांनी विचारलं काय झालं. मी नगराध्यक्षांचा मुद्दा सांगितला. माझ्या मतदार संघातील नगराध्यक्षाला अपात्र ठरवण्यात आले.

याच मुद्द्यात मी त्यांना भेटलो आणि त्यांच्या कानावर विषय घातला. यावर ते म्हणाले मी माहिती घेतो. त्या आधी मी एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. ते दिल्लीत होते. त्यांचा फोन बंद होता. त्यामुळे मी सीएमला भेटलो. त्यांनाही सांगितलं. एक पाच दहा मिनिटे भेटलो आणि बाहेर आलो. मी हॉलमध्ये बसलेलो. ते बऱ्याच वेळाने आले.

सीएम म्हणाले, गडबड सुरू आहे. मिटिंग सुरू आहे. ते म्हणाले काय आहे. मी माहिती दिली. ते म्हणाले, मी दोन दिवसात माहिती घेऊन सांगतो. आम्ही अपील करणार असल्याचं सांगितलं. नगरविकास मंत्र्यांकडे अपील करावं लागतं. पण नगरविकास मंत्री नव्हते. मी हॉलमध्ये एकटाच होतो. बऱ्याच वेळाने सीएम बाहेर आले.

तिथे तटकरे आले माहीत नाही. आतमध्ये कोणाशी चर्चा करत होते हे माहीत नाही. मी घरी आल्यावर फुटबॉलची मॅच पाहत होतो. त्यावेळी अशा बातम्या सुरु असल्याचे मेसेज आले. म्हटलं सकाळीच बोलू. म्हणून आता बोललो. विलिनीकरणाच्या चर्चेशी काही संबंध नाही. मी फक्त नगराध्यक्ष अपात्र ठरल्याचं कारण होतं. मी त्यांना भेटलो. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर होते, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक