AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Emraan Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला झाला स्वाइन फ्लू; ‘आवारापन 2’ च्या यशादरम्यान मोठी अपडेट समोर

Emraan Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मी सध्या 'आवारापन 2'मध्ये दिसतोय. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून गल्लाही चांगला कमावला आहे. याच यशादरम्यान इम्रानच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

Emraan Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला झाला स्वाइन फ्लू; 'आवारापन 2' च्या  यशादरम्यान मोठी अपडेट समोर
Actor Emraan Hashmi
| Updated on: Aug 29, 2026 | 4:00 PM
Share

बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांपैक एक असलेला अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या त्याच्या ‘आवारापन 2’ चित्रपटाचं यश एन्जॉय करतोय. मात्र याचदरम्यान त्याच्या तब्येतीविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, इम्रान हाश्मीला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्याची H1N1 टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. कामासंदर्भात बराच प्रवास त्याने केला, त्यावेळीच त्याची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्याने टेस्ट केली असता त्याचे रिपोर्टस पॉझिटिव्ह आले आहेत. त्याला बरं वाटावं यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

नक्की काय घडलं ?

अभिनेता इमरान हाश्मी याला स्वाइन फ्लू म्हणजेच H1N1 ची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंगसाठी इम्रान नुकताच रांचीला गेला होता, मात्र रांचीहून परतल्यानंतर इम्रानला काही दिवसांपासून बरं वाटत नव्हतं. त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याने चाचणी करून घेतली, त्याच्या चाचणीचा अहवाल काल समोर आला. या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्ला

इम्राने रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा आणि योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार सध्या तो विश्रांती घेत आहे. याबाबत अभिनेत्याकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

इम्रानचा ‘आवारापन 2’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी मोठ्या पडद्यावर रिलीज जाला, त्याला चांगलं यश मिळत आहे. 2007 साली आलेल्या ‘आवारापन’ चा हाँ सिक्वेल असून चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 14 ऑगस्ट 2026 ला रिलीज झालेला हाँ चित्रपट पहिल्या दिवसापासूनतच ब़ॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी करत असून कमाईही उत्तम केली आहे. बॉलीवुड हंगामा नुसार, या चित्रपटाने जगभरात 200 कोटींचा गल्ला कमावला आहे. या चित्रपटात दिशा पाटनी ही देखील प्रमुख भूमिकेत आहे. तसेच सुविंदर विक्की, विजयंत कोहली आणि पूरन गब्बी हेही चित्रपटात आहेत. नितीन कक्कड यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपाटत इम्रान पुन्हा शिवम पंडित च्या भूमिकेत दिसलाय.

Follow Us
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन