AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohan Bhagwat : आज रात्री मोहन भागवत प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथून करणार संबोधित

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या ISKCON मंदिरात RSS प्रमुख मोहन भागवत यांनी नागरिकांना संबोधित केलं.

Mohan Bhagwat : आज रात्री मोहन भागवत प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथून करणार संबोधित
Mohan Bhagwat
| Updated on: Aug 29, 2026 | 3:23 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या ISKCON मंदिरात RSS प्रमुख मोहन भागवत यांनी नागरिकांना संबोधित केलं. “संपूर्ण जग कृष्णमय असून आपल्याला त्यांची चेतना जागृत करायची आहे. आपण सगळे एक आहोत. या जगात मतभेद आहेत. विविधता, संघर्ष आणि विरोधाभास आहे, पण अंतिम सत्य कृष्ण आहे. हीच भगवद् गीतेची मुख्य शिक्षा आहे. आयुष्यापासून पळू नका, ठामपणे उभे राहा. तुमचे कर्तव्य निभवा, हे समजून घ्या की, सर्व काही दिव्य आहे. जर हा संदेश प्रत्येक ह्द्ययापर्यंत पोहोचला तर खरच आपलं जग एक सुंदर जागा बनेल. आजच्या भौतिक सीमांमध्ये अडकून पडणार नाही. सर्वांसाठी ही स्वर्गासारखी जागा बनेल ” असं मोहन भागवत म्हणाले.

“एका कॉर्पोरेट संघटनेबद्दल विचार करा. डायरेक्टर आणि CEO रणनितीक योजना बनवतात. असंख्य लोक ते विजन प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणून एकत्र मिळून काम करतात. काही लोक ती मोठी योजना समजून घेतात. काहींना ते समजत नाही. पण तरीही प्रत्येकजण त्या अंतिम उद्देशासाठी योगदान देतो. सर्वांना हे माहित असतं की, ते एका संयुक्त लक्ष्यासाठी काम करतायत. प्रगतीचा वेग प्रचंड आहे. त्याच प्रकारे आपण सर्व सुद्धा दिव्य सेवेमध्ये आहोत” असं मोहन भागवत म्हणाले.

किती वाजता कार्यक्रम?

“मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्हाला या पवित्र ठिकाणी रोज-रोज येण्याचं भाग्य लाभतय. त्यामुळे तुम्ही कृष्ण चेतनेशी जोडलेले आहात. आपण राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची शताब्दी साजरी करत आहोत” असं मोहन भागवत म्हणाले. आज मोहन भागवत अमेरिकेत प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथे भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 12 वाजता हा कार्यक्रम होईल.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ