ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे 50 मिनिटांच्या बैठकीत…
शिवसेना ठाकरे गटातून शिंदेसेनेत गेलेल्या 6 खासदारांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. सुमारे 50 मिनिटे ही बैठक सुरू होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

बैठकीदरम्यान या खासदारांच्या मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. विविध प्रकल्पांना मंजुरी, आवश्यक निधी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, लोकसभेतील खासदारांचे विलीनीकरण आणि शिंदेसेनेच्या भविष्यातील राजकीय सहभागाबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
खासदारांच्या वतीने मतदारसंघातील लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांसाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली. यावर कोणत्याही विकासकामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही अमित शहा यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.
Published on: Jul 15, 2026 10:36 AM
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर