PF खात्यातून ऑनलाईन पैसे कसे काढावे, जाणून घ्या A TO Z माहिती

| Updated on: Apr 13, 2024 | 6:44 PM

EPFO : आपण नोकरी करत असाल तर आपल्या नावावर पीएफ खात्यात पैसे जमा होत जातात. हे जमा झालेले पैसे तुम्हाला दरज असेल तेव्हा तुम्ही काढू शकता. ऑनलाईन हे पैसे कसे काढावे आणि काय आहे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

PF खात्यातून ऑनलाईन पैसे कसे काढावे, जाणून घ्या A TO Z माहिती
PF MONEY WITHDRAW
Follow us on

EPF Withdraw : तुम्ही नोकरीला असाल आणि तुमच्या पगारातून पण जर पीएफ कापला जात असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) मधून पैसे कसे काढायचे हे अनेकांना माहित नसले. गरज पडल्यास तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यातून पैसे काढू शकता. EPF काढण्याच्या नियमांनुसार, EPF खातेधारक त्यांच्या पात्रतेनुसार त्यांच्या खात्यातून आंशिक किंवा पूर्ण रक्कम काढू शकतात. साधारणपणे, सदस्य दोन महिने किंवा त्याहून अधिक काळ जर बेरोजगार असेल तर त्याला संपूर्ण EPF रक्कम काढता येते. याशिवाय, ईपीएफओ सदस्य निवृत्तीनंतर त्याच्या पीएफ खात्यातून संपूर्ण रक्कम काढू शकतो. दरम्यान, EPFO ​​सदस्य विविध परिस्थितींमध्ये त्याच्या PF खात्यातून आंशिक पैसे काढण्यासाठी अर्ज करू शकतो.

कोणत्या गोष्टीसाठी काढता येतात पैसे

  • स्वतःचे किंवा मुलाचे लग्न असल्यास तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता.
  • वैद्यकीय गरज असेल तेव्हा देखील तुम्ही पैसे काढू शकता.
  • घर खरेदी करण्यासाठी तुम्हाला पीएफमधून पैसे काढता येतात.
  • गृहकर्ज फेडण्यासाठी देखील तुम्ही पैसे काढू शकता.
  • घराचे नूतनीकरण करण्यासाठी तुम्ही पीएफचे पैसे काढू शकता.

आंशिक पैसे काढण्यासाठी तुम्हाला किमान पाच किंवा सात वर्षांसाठी EPF सदस्य असणे आवश्यक आहे. तुम्ही नोकरी बदलल्यास, तुमची EPF पासबुक शिल्लक स्वयंचलितपणे नवीन नियोक्त्याकडे हस्तांतरित केली जाईल.

पीएफ खात्यातून ऑनलाइन पैसे कसे काढावे

प्रथम तुमच्याकडे चार तपशील आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN), सदस्याचा बँक खाते क्रमांक, आयडी पुरावा आणि कॅन्सल चेक.

हे सुद्धा वाचा
  1. सर्वात आधी तुम्हाला UAN पोर्टलवर जाऊन तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल.
  2. तुम्हाला आधारशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी मिळेल. हा OTP आणि captcha टाका.
  3. तुमचे प्रोफाइल पेज उघड्यानंतर वेबपेजच्या वरच्या उजव्या बाजूला तुम्हाला “ऑनलाइन सेवा” हा पर्याय दिसेल. आता स्क्रोल डाउन ऑप्शन्समधून ‘क्लेम’ वर क्लिक करा.
  4. तुम्हाला आता ईपीएफओशी जोडलेला बँक खाते क्रमांक टाकून सदस्याच्या तपशीलांची पडताळणी करावी लागेल.
  5. तुम्हाला एक सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग मिळेल ज्यामध्ये दावा केलेली रक्कम EPFO ​​द्वारे या बँक खात्यात जमा केली जाईल. आता
  6. तुम्हाला नियम आणि अटींवर ‘होय’ वर क्लिक करावे लागेल.
  7. तुम्ही ऑनलाइन दाव्यासाठी पुढे जाऊ शकता. तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच, एक टॅब उघडेल ज्यामध्ये तुम्हाला अधिक तपशील प्रविष्ट करावे लागतील.
  8. येथे तुम्हाला तुमचा पत्ता द्यावा लागेल आणि स्कॅन केलेला कॅन्सल चेक आणि फॉर्म 15G सारखे काही दस्तऐवज अपलोड करावे लागतील.

अशा प्रकारे, ईपीएफ खात्यातील शिल्लक रक्कम काढण्यासाठी तुम्ही दावा करु शकता.