
पावसाळा सुरू होताच थंड गार वारा आणि हिरवगार निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी प्रत्येकजण कुठे ना कुठे जात असतात. कारण निसर्गाचे मनमोहक दृश्य पाहुन व त्या सानिध्यात जाऊन आपल्या मनाला आराम मिळतो.
जेव्हा पावसाळा आपल्या सर्व सौंदर्यासह पृथ्वीवर येतो तेव्हा भारतातील अशी काही गावं आहेत जी अधिकच आकर्षक दिसतात. ही गावं केवळ सौंदर्यापुर्तिच मर्यादीत न राहता ही गावं सर्वात स्वच्छ गावांच्या यादीतही त्यांचा समावेश आहे. काही गावांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियातील सर्वात स्वच्छ गाव असे पुरस्कारही मिळाले आहेत. खरोखरच ही गावे स्वर्गापेक्षा कमी दिसत नाहीत. मेघालयातील मावलिनॉंग गाव असो किंवा हिमाचल प्रदेशातील नोक, पावसाळ्यात या गावांचे सौंदर्य शिगेला पोहोचते.
पावसाच्या सरी, हिरव्या दऱ्या, हिरवेगार डोंगर आणि स्वच्छ हवा यामुळे ही गावे एखाद्या चित्रपटाच्या दृश्यासारखी दिसतात. विशेष म्हणजे येथे शहरांसारखी गर्दी आणि प्रदूषण नाही. या गावांचे साधेपणा, स्वच्छता आणि नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला शांततेची भावना देते. जर तुम्हाला या पावसाळ्यात आरामदायी प्रवासाचा अनुभव हवा असेल तर या गावांना नक्की भेट द्या. चला तर मग आजच्या या लेखात आपण भारतातील त्या 4 गावांबद्दल जाणून घेऊया, जे स्वच्छता आणि नैसर्गिक सौंदर्यात नंबर वन मानले जातात.
मेघालयातील मावलिनॉन्ग गाव हे आशियातील सर्वात स्वच्छ गावांपैकी एक आहे. हे गाव त्याच्या स्वच्छता आणि पर्यावरणपूरक पद्धतींसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथील प्रत्येक रस्ता स्वच्छ आहे आणि प्रत्येक घराबाहेर एक कचराकुंडी आहे. पावसाळ्यात हे गाव एखाद्या परीकथेसारखे दिसते. पावसाळ्यात तुम्हाला ढगांनी वेढलेले डोंगर, हिरवळ आणि येथील थंड वारा अनुभवायला मिळेल. जर तुम्ही इथे आलात तर लिविंग रूट ब्रिज, क्लीन वॉकवे, धबधबे आणि बांबूची घरे पहायला विसरू नका.
हिमाचल प्रदेशात स्पितीच्या उंचीवर वसलेले नोक हे छोटेसे गाव पावसाळ्यात खूप शांत आणि सुंदर दिसते. येथील संस्कृती आणि सौंदर्य दोन्ही मनाला शांती देते. येथील लोकं बौद्ध संस्कृतीशी जोडलेले आहेत. येथे तुम्ही ढगांनी वेढलेले डोंगर, पावसाळ्यात थंड आणि ताजी हवा यांचा आनंद घेऊ शकता. या गावात पाहण्यासाठी कमी पर्यटन स्थळे असले तरी तुम्ही येथील पारंपारिक घरे, बर्फाळ शिखरे आणि स्थानिक बौद्ध मठ एक्सप्लोर करू शकता.
केरळचा हा परिसर पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसतो. पावसाळ्यात इडुक्की गावातील दऱ्या त्यांच्या अवतीभोवती हिरवी मखमली चादर ओढून घेतात आणि धबधब्यांचा आवाज येथील वातावरणाला संगीतमय बनवतो. या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील हिरवळ, डोंगराळ प्रदेश, धबधबे आणि चहाचे बागा, जे पाहण्यासारखे आहेत. येथे तुम्ही इडुक्की धरण, वागमोन, चहाचे मळे, वन्यजीव अभयारण्य एक्सप्लोर करू शकता.
खोनोमा हे भारतातील पहिले ग्रीन व्हिलेज मानले जाते. खोनोमा गाव केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नाही तर पर्यावरण संवर्धनासाठी देखील ओळखले जाते. येथील लोक जंगलातील झाडे तोडत नाहीत आणि जैवविविधता राखतात. येथे तुम्ही टेरेस फार्मिंग, नागा संस्कृती, पारंपारिक वास्तुकला एक्सप्लोर करू शकता. पावसाळ्यात, हलक्या पावसात येथे हिरवळ आणि लोकसंस्कृतीचा संगम दिसून येतो.