
समाजात अशा अनेक प्रथा-परंपरा आहेत ज्या आजही पाळल्या जातात, मानल्या जातात. पण प्रत्यक्षात त्यांना कोणताही ठोस आधार नसतो. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे मासिक पाळीच्या वेळी मुलींनी लोणच्याला हात लावू नये. अन्यथा लोणचे खराब होतं. मासिक पाळीच्याबाबत आजही अनेक प्रथा-परंपरा पाळल्या जातात. त्यातील एक म्हणजे देवाला हात न लावणे. किंवा कोणत्याही पुजेत सहभागी न होणे. त्यासोबतच अजून एक प्रथा म्हणजे पाळीच्या वेळेस लोणचे किंवा घरी बनवलेले मसाल्याला हात लावू नये. कारण खराब होतात. पण खरंच असं असतं का? याबद्दल सुप्रसिद्ध वक्ता आणि कथाकार जया किशोरी यांनी उत्तर दिलं आहे. जया किशोरी यांनी जे मत मांडलं त्यावर त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.
पूर्वीच्या काळात मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेसाठी विशेष साधने
एका मुलाखतीत या प्रश्नाचे उत्तर देताना जया किशोरी म्हणाल्या की, लोणच्याला स्पर्श केल्याने ते खराब होण्याचे कोणतेही ठोस कारण नाही. त्या म्हणाल्या की, पूर्वीच्या काळात मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेसाठी विशेष साधने नव्हती त्यामुळे महिलांना काही काळ स्वयंपाकघरापासून दूर ठेवले जात असे. पण आजच्या काळात जेव्हा स्वच्छतेसाठी पूर्ण व्यवस्था आहे. पण तरी देखील त्यावेळी सांगितलेली ही प्रथा आजही सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी आजही ही परंपरा पाळली जाते.
महिलांना काही काळ स्वयंपाकघरापासून दूर ठेवले जात असे.
जया किशोरी यांनी स्पष्टपणे सांगितले की, अनेक वेळा मुलींना पाळीच्या दरम्यान लोणच्याला हात लावण्यास मनाई केली जाते. यामुळे मुलींच्या मनात भीती निर्माण झाली आहे. खरं तर, हा त्यांना घाबरवण्याचा एक मार्ग होता जेणेकरून ते स्वयंपाकघरात जाऊ नये. कारण पूर्वी इतकी स्वच्छता नव्हती आणि वैद्यकीय सुविधाही नव्हत्या.
रक्ताच्या वासाने प्राणी आकर्षित होऊ शकत होते
त्या पुढे म्हणाल्या की, पूर्वी पॅड आणि टॅम्पॉन्स सारख्या गोष्टी नव्हत्या. अशा परिस्थितीत महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असे. जुन्या काळात प्राण्यांपासूनही धोका होता, कारण रक्ताच्या वासाने प्राणी आकर्षित होऊ शकत होते. अशा परिस्थितीत महिलांना घराच्या एका कोपऱ्यात किंवा वेगळ्या खोलीत ठेवले जात असे, जेणेकरून त्या सुरक्षित राहू शकतील.
मासिक पाळीच्या काळात महिलांना ‘अपवित्र’ मानले जाऊ लागले.
जया किशोरी म्हणाल्या की कालांतराने या परंपरा इतक्या अतिरेक केल्या गेल्या की मासिक पाळीच्या काळात महिलांना ‘अपवित्र’ मानले जाऊ लागले. परंतु जर योग्यरित्या विचार केला तर, तो त्या काळाच्या गरजांनुसार घेतलेला निर्णय होता, जो नंतर चुकीच्या पद्धतीने पसरवला गेला. त्यामुळे पाळीच्या काळात मुलींनी लोणचे किंवा मसाल्यांना हात लावला तर ते खराब होताता हा एक गैरसमज असल्याचं त्यांनी सांगितलं.
म्हणून पूर्वी मुलींना लोणचे, मसालेंना हात न लावण्याचा सल्ला दिला जातो
तसेच याचे आणखी एक कारण सांगितलं जातं. ते म्हणजे की, पाळीच्या वेळेस मुलींमध्ये बरचे हार्मोनल चेंजेस होतात. तसेच त्यांच्या शरीराचे तापमानही वाढलेले असते.अशा वेळेस जर त्यांनी लोणच्याच्या बरण्यांना हात लावला तर शरीरातील हीट त्यात उतरली तर त्यामुळे ते खराब होण्याची देखील भीती असते. त्यामुळे देखील पाळीच्या काळात मुलींना लोणचे, मसालेंना हात न लावण्याचा सल्ला दिला जातो.