गालावरची खळी सांगते आयुष्यातील अनेक रहस्ये, मुलींच्या गालावर असेल ‘डिंपल’ तर घडेल विशेष योगायोग!

गालांवर पडणारी खळी अर्थात ‘डिंपल’ कोणत्याही व्यक्तीस केवळ सुंदर बनवत नाही, तर लोकांच्या गर्दीमध्ये त्या व्यक्तीला खास बनवते. बॉलिवूडमध्ये दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, शाहरुख खान, गुल पनाग यासारख्या कलाकारांच्या गालावर ‘डिंपल’ आहेत.

गालावरची खळी सांगते आयुष्यातील अनेक रहस्ये, मुलींच्या गालावर असेल ‘डिंपल’ तर घडेल विशेष योगायोग!
गालावरची खळी
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 3:30 PM

मुंबई : आपण बर्‍याच लोकांच्या तोंडून ऐकले असेलच, एखाद्या मुलीचा किंवा मुलाचा रंग काही असो, त्याने फरक पडत नाही, फक्त त्यांचा चेहरा दर्शनीय असावा. खासकरून लग्नासाठी मुलगी किंवा मुलगा निवडताना ही गोष्ट समोर येते. डोळे, नाक, गाल इत्यादि नैन-नक्ष तपासले जातात. या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणखी एक गोष्ट अशी आहे, ज्याची उपस्थिती केवळ त्या व्यक्तीचे रूपच खुलवत नाही, तर त्याला खूप आकर्षक देखील बनवते. हो, आपण गालावर पडणाऱ्या खळी विषयी बोलत आहोत (Know about dimple on your cheeks what does it tells about you).

गालांवर पडणारी खळी अर्थात ‘डिंपल’ कोणत्याही व्यक्तीस केवळ सुंदर बनवत नाही, तर लोकांच्या गर्दीमध्ये त्या व्यक्तीला खास बनवते. बॉलिवूडमध्ये दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, शाहरुख खान, गुल पनाग यासारख्या कलाकारांच्या गालावर ‘डिंपल’ आहेत. वास्तविक, गालवर पडणारी ही खळी आपल्या जीवनाबद्दल आणि भविष्याबद्दल बरेच रहस्य सांगते.

आयुष्याबद्दल काय सांगते गालावरची खळी?

सहसा गालावर पडणारी खळी केवळ हसतानाच येतात. गालांमध्ये पडणारी खळी एखाद्या व्यक्तीसाठी खूप भाग्यवान देखील असू शकते. शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या गालावर खळी आहे ते लोक सौम्य आणि संवेदनशील असतात. अशा लोकांना कला क्षेत्रात खूप रस असतो. एवढेच नव्हे तर, असे लोक इतरांची मदत करण्यात देखील पुढे असतात. शास्त्रात असेही म्हटले आहे की, ज्या लोकांना हसताना गालावर डिंपल येतात, त्या लोकांचे वैवाहिक आयुष्य खूप आनंदी आणि विलासी असते.

गालांमध्ये पडणारी डिंपल विशेषत: मुलींसाठी खूप चांगली असल्याचे म्हटले जाते. डिंपल असलेल्या मुली आपल्या पतींबरोबर खूप आनंदी आयुष्य जगतात. तथापि, अशा मुलींच्या आयुष्यात एक समस्या देखील असते. असं म्हणतात की, ज्या मुलींच्या गालावर डिंपल असतात, त्या मुलींना सासूचा आनंद मिळत नाही (Know about dimple on your cheeks what does it tells about you).

सगळ्यांच्या गालावर खळी का नाही?

फारच कमी लोकांच्या गालावर खळी पडते. आपण असेही म्हणू शकता की, खूप भाग्यवान लोकांच्या गालावरच खळी पडत असावी. कधीकधी तर एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही गालांवर खळी पडते, तर बर्‍याच लोकांच्या एकाच गालावर खळी पडते. गालावरचे हे गोड ‘डिंपल’ सामान्यत: अनुवांशिक मानले जातात, जे त्यांना त्यांच्या पालकांकडून वारसा म्हणून मिळतात.

परंतु, असे नाही की ज्या लोकांना डिंपल आहेत, त्यांच्या मुलांच्या गालांवरही डिंपल असतीलच. वास्तविक, आपल्या गालांच्या स्नायूंच्या बदलांमुळे या ‘खळी’चा जन्म होतो. ज्या लोकांच्या गालांचे स्नायू इतरांपेक्षा लहान आहेत त्यांच्या गालांवर डिंपल पडतात. डिंपल येण्यासाठी असलेल्या गालच्या स्नायूला ‘जायगोमॅटिक्स’ म्हणतात.

(Know about dimple on your cheeks what does it tells about you)

हेही वाचा :

Maggi Story | सामान्य जनतेवरील ताण दूर करण्यासाठी झाला होता ‘मॅगी’चा जन्म, ‘या’ काळात झाली भारतात एंट्री!

PHOTO | आजही येथे अस्तित्त्वात आहेत ‘रहस्यमय’ दगडी भांडी, आतापर्यंत वैज्ञानिकही उलगडू शकले नाही गुपित

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.