विजा चमकल्यावर ढगांचा गडगडाट आवाज येण्यामागे नेमके कारण काय,जाणून घेऊया इंटरेस्टिंग माहिती!

| Updated on: Mar 11, 2022 | 8:19 PM

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा वातावरणात बदल झालेला असतो. या वातावरणातील बदलामुळे सुद्धा अनेकदा आकाशामध्ये विजा चमकत असतात.विजा चमकल्यावर ढगांचा गडगडाट ऐकू येतो. हा आवाज येण्या मागे नेमके वैज्ञानिक कारण काय आहे, हे अनेकांना माहिती नसते.

विजा चमकल्यावर ढगांचा गडगडाट आवाज येण्यामागे नेमके कारण काय,जाणून घेऊया इंटरेस्टिंग माहिती!
lighting
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये बदल ( climate changes ) अनेकदा होत असतात. कधी सोसाट्याचा वारा असतो, कधी मोठे वादळ असते तर कधी ढगाळ वातावरण असते. वेगवेगळे वातावरण असताना अनेकदा पावसाळा किंवा वादळाच्या वेळी आकाशात विजा( lighting) चमकणे ही सर्वसाधारण बाब असते.अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, जेव्हा आकाशामध्ये विजा चमकतात तेव्हा सर्वप्रथम आपल्याला एक प्रकाश दिसतो आणि हा प्रकाश दिसल्यानंतर मोठा आवाज ऐकू येतो यालाच ढगांचे गडगड करणे असे देखील म्हटले जाते. परंतु कधी आपल्या मनामध्ये विचार आलेला आहे का? की, हा आवाज नेमका कुठून येतो. हा आवाज येण्यामागे काही वैज्ञानिक कारण( scientific reason) आहे का? जर तुमच्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही प्रश्न येत असतील तर आजच्या लेखामध्ये आपण या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. एकंदरीत आकाशामध्ये वीज कोठून येते वीज झाल्यावर इतका प्रचंड ढगांचा गडगडाट होतो तरी कसा ?

कशी तयार होते वीज ?

अनेकदा वातावरणामध्ये बदल होऊन वादळ आल्यानंतर ढग एकमेकांना आदळतात. कधी कधी ढग एकमेकांना आदळल्यानंतर ढगांच्या संपर्कामध्ये इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होतो आणि जेव्हा एका ढगांवर दुसरे ढग वारंवार आदळू लागतात, अशा वेळी दोघांच्या घर्षणामुळे वीज निर्माण होते. जेव्हा आकाशातून जमिनीवर वीज पडते तेव्हा या दरम्यान इलेक्ट्रिक चार्जची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात होत असते.ढगांच्या प्रमाणेच विजेची गती देखील वाढलेली असते. असे म्हटले जाते की, विजेची गती 1 लाख किलोमीटर प्रति सेकंद प्रमाणे असते म्हणजेच प्रकाश वर्षापेक्षा थोडी कमी परंतु त्याच्या पेक्षा हि खुपच जास्त असते.

नेमका आवाज येतो तरी कुठून?

जेव्हा वीज जमिनीच्या दिशेने येऊ लागते किंवा वातावरणामध्ये विजेचे परिस्थिती तयार होऊ लागते अशा वेळी विजेचा प्रवाह होत असताना आजूबाजूची हवा गरम असते. ही हवा 20,000 ते 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम होऊन जाते. हवा इतकी गरम होती की, ती वीज विस्फोटाप्रमाणे पसरू लागते त्यामुळे आजूबाजूला वेगाने लहरी निर्माण होतात. निर्माण होणाऱ्या तरंग तयार होतात आणि हे तरंग सर्व दिशांना वेगाने पसरतात.

आवाज येण्यामागील खरे कारण म्हणजे हे तरंग आहेत. या ध्वनी लहरीची गती 340 मीटर प्रति सेकंद असते यावरून आपण अंदाज लावू शकतो की,वीज किती दूर पडली आहे.

संबंधित बातम्या