82 वर्षीय अल पचीनोसारखे कोणत्याही वयात बनता येते वडील, आवश्यकता आहे या अटींची

| Updated on: May 31, 2023 | 11:39 PM

पुरुष जीवनभर फर्टाईल राहतात. कोणत्याही वयात ते वडील होऊ शकतात. परंतु, डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की, वयाच्या ४० नंतर स्पर्म काउंट कमी होतात.

82 वर्षीय अल पचीनोसारखे कोणत्याही वयात बनता येते वडील, आवश्यकता आहे या अटींची
Follow us on

नवी दिल्ली : हॉलीवूड अॅक्टर अल पचीनो ८३ वर्षीय वयाच्या चौथ्या मुलाचे वडील होत आहेत. त्यांची २९ वर्षीय प्रेमिका नूर अल्फल्लाह आठ महिन्यांची गर्भवती आहे. अल पचीनोच्या खुलाशानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. नंतर एक प्रश्न असा निर्माण झाला की, ८३ वर्षीय वयाचे वडील होणार आहेत. बदलती जीवनशैली आणि व्यस्त जीवनशैलीमुळे पुरुषांचं वंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. डॉक्टर असा सल्ला देतात की, ४० वर्षांनंतर स्पर्म काउंट कमजोर होतात. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की, १०० वर्षांपर्यंत वडील होण्याचे सामर्थ्ये पुरुषांमध्ये राहू शकते. फक्त त्यांचे स्पर्म काउंट मजबूत होणे गरजेचे आहे.

म्हातारपणापर्यंत पुरुषांचे स्पर्म बनतात

पुरुष जीवनभर फर्टाईल राहतात. कोणत्याही वयात ते वडील होऊ शकतात. परंतु, डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की, वयाच्या ४० नंतर स्पर्म काउंट कमी होतात. परंतु, त्यांची संख्या ४० नंतर कमी होत जाते. जीवनशैली खराब असल्यास वयाच्या ४० नंतर वडील होण्याची शक्यता कमी असते. स्पर्म तर म्हातारपणापर्यंत तयार होतात. वयाच्या १०० वर्षांपर्यंत स्पर्म तयार होतात. परंतु, स्पर्म काऊंट चांगले पाहिजे.

 

हे सुद्धा वाचा

दारू पिणे, धुम्रपान करणे यामुळे नकारात्मक परिणाम येतात. यामुळे पुरुषांच्या फर्टीलिटीवर परिणाम पडतो. दिल्लीतील आयव्हीएफ क्लीनिकचे डायरेक्टर डॉ. गुंजन शर्मा म्हणतात. ज्या व्यक्तीची जीवनशैली चांगली आहे, तो कोणत्याही आजाराला बळी पडत नसेल, तर वडील होऊ शकतो.

जगात सर्वात जास्त वयाचे वडील होण्याचा मान हरियानाच्या रामजीत राघव यांना आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी ते दुसऱ्या मुलाचे वडील झाले. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरीया शहरात लेस कोलेच्या नावाने गिनीज बूक ऑफ रेकॉर्ड आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी वडील होण्याचा आहे. तिसरा रेकॉर्ड राजस्थानच्या नानूराम यांच्याकडे आहे. नानू वयाच्या ९० व्या वर्षी २१ व्या मुलाचे वडील झाले.

 

१ मिली सिमनमध्ये दीड कोटी स्पर्म हे हेल्दी मानले जातात. यासाठी लॅब टेस्ट केली जाते. यातून स्पर्म हेल्दी आहेत की नाही याची माहिती होते. विशेषतः ४० वर्षांनंतर प्रेग्नसीत समस्या होत असेल तर डॉक्टर टेस्ट करण्याचा सल्ला देतात. प्रेग्नन्सीसाठी सुमारे ४० टक्के स्पर्म सक्रिय होणे आवश्यक असते.