जगातील सर्वात क्रूर राणी! प्रियकराला मारलंच पण अशी कत्तल केली की अर्धं राज्यच संपवून टाकलं!

इतिहासात अनेक क्रूर राज्यकर्त्यांचा उल्लेख तुम्ही वाचला असेल, मात्र अशा काही राण्या होत्या ज्यांनी आपल्या कार्यकाळात क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. अशीच एक राणी पूर्व आफ्रिकेतील मादागास्करची राणी राणावलोना होती. जी आपल्या क्रूरतेसाठी ओळखली जायची.

जगातील सर्वात क्रूर राणी! प्रियकराला मारलंच पण अशी कत्तल केली की अर्धं राज्यच संपवून टाकलं!
queen ranavalona
| Updated on: Sep 27, 2025 | 10:27 PM

इतिहासात अनेक क्रूर राज्यकर्त्यांचा उल्लेख तुम्ही वाचला असेल, मात्र अशा काही राण्या होत्या ज्यांनी आपल्या कार्यकाळात क्रुरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. अशीच एक राणी पूर्व आफ्रिकेतील मादागास्करची राणी राणावलोना होती. जी आपल्या क्रूरतेसाठी ओळखली जायची. हिस्ट्री एक्स्ट्रा नुसार राणावलोना राणीने 1828 ते 1861 या कालावधीत देशावर राज्य केले. युरोपीय लोक जगभरात त्यांचे वसाहती स्थापन करत असताता ती देशाची राणी बनली होती. ती मादागास्करला ब्रिटिश आणि फ्रेंच राजवटीपासून दूर ठेवण्यास यशस्वी झाली होती.

नरसंहारामुळे लोकसंख्या झाली होती कमी

राणी राणावलोना ही खूप क्रूर होती. तिच्या काळात तिने अनेकांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती, त्यामुळे मादागास्करची लोकसंख्या निम्म्यापर्यंत कमी झाली होती. तिच्या कारकि‍र्दीत तिने विशेषतः ख्रिश्चन लोकांविरुद्ध हत्याकांड घडवले होते, त्यामुळे तिला सर्वात क्रूर राणीची म्हटले जाते.

रस्ता बांधण्यासाठी 10,000 लोकांचा घेतला जीव

समोर आलेल्या माहितीनुसार या राणीने आपल्या दरबारातील लोकांसाठी आणि नातेवाईकांसाठी म्हशींच्या शिकारीचे आयोजन केले होते. ही शिकार करताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून तिने रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने हजारो लोकांकडून दिवसरात्र काम करून घेतले. त्यामुळे रस्ता बांधताना भूक, तहान आणि थकव्याने जवळपास 10 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

कट रचल्याच्या संशयावरून हजारो लोकांना संपवलं

राणी राणावलोनाविरुद्ध अनेक कट रचण्यात आले होते. तिला अनेकांवर संशय होता, तिने लोकांची चाचणी घेण्यासाठी टँजेना चाचणी सुरू केली होती. यात एक विषारी अक्रोड खाण्यापूर्वी कोंबडीच्या कातडीचे तीन तुकडे खावे लागायचे. यामुळे उलट्या व्हायच्या, जर एखाद्याच्या उलटीतून कोंबडीच्या कातडीचे तीनही तुकडे बाहेर पडले तर तो निष्ठावान आहे असं मानलं जायचं, मात्र जो यात अपयशी व्हायचा त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात यायची. यात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.

जवळच्या लोकांनाही शिक्षा

या राणीने स्वतःच्या कुटुंबालाही शिक्षा दिली होती. तिने बंडाच्या भीतीने जवळच्या नातेवाईकांनाही मारले होते. तिने तिच्या बहिणीला आणि तिच्या पतीच्या पुतण्याला उपाशी ठेवले. तसेच या एकदा राणीने तिच्या एका प्रियकराला दुसऱ्या महिलेसोबत पकडले होते, त्यामुळे तिने त्याचा शिरच्छेद केला होता. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला तिने ख्रिश्चन धर्माचा प्रचार केला. मात्र कालांतराने तिने ख्रिश्चनांवर कट रचल्याचा आरोप करत त्यांची हत्या केली होती.