नेल कटरमधील दोन गोष्टींचा वापर कशासाठी होतो? 99 टक्के लोकांना माहीतच नाही
आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या नेल कटरचे अनेक फायदे आहेत. नखे कापण्याव्यतिरिक्त, नेल कटरचा वापर बॉटलचे झाकण उघडण्यासाठी, फळे कापण्यासाठी, आणि चाव्यांच्या बंडलला जोडण्यासाठी करता येतो. त्यातील लहान चाकूने अनेक छोटी कामे सोपी करता येतात, पण वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.

आजकालच्या व्यस्ततेच्या जीवनात लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. खाण्यापिण्याशिवाय आणि इतर महत्त्वाच्या कामांशिवाय पर्सनल काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. हात आणि पाय हे सुद्धा पर्सनल केअरमध्येच येतात. त्यामुळे हातापायाची साफसफाई ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तुमची नखं वाढली असेल तर त्यात घाण साचते. त्यामुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे नखं वेळेत कापली पाहिजे. नखं कापण्यासाठी साधारणपणे लोक नेल कटरचाच वापर करतात. नेल कटरमध्ये दोन चाकू आणि काही हत्यारे असतात. त्याचा वापर कशासाठी होतो माहीत आहे का?
खरंतर नेल कटरचं काम फक्त नखं कापणं एवढंच असतं. त्यानंतर त्याचा काहीच उपयोगन नसतो. त्यामुळेच नेल कटरचा उपयोग व्हावा म्हणून त्यात दोन चाकू अधिकचे देण्यात आले. त्यामुळे नखं कापण्याशिवाय नेल कटरचा अन्य कामासाठीही उपयोग होत आहे. त्यामुळेच या दोन्ही चाकूंचा कशा कशासाठी वापर होतो ते आपण पाहुया.
या दोन चाकूंचा समावेश केल्यानंतर नेल कटरची उपयोगिता अधिकच वाढली आहे. तुम्ही हे नेल कटर ट्रिपलाही नेऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. तुम्ही कुठे तरी बाहेर आहात आणि तुमच्या बॉटलचं झाकण उघडत नसेल तर तुम्ही झाकण दाताने उघडण्याचा कधीही प्रयत्न करू नका. दाताला इजा होऊ शकते आणि त्यातून रक्त येऊ शकतं. किंवा दात कमकुवत होऊ शकतात. हलू लागू शकतात. अशावेळी तुम्ही बॅगेत ठेवलेल्या नेल कटरचा वापर करा. नेल कटरमधील छोट्याश्या अटॅचमेंटला (कर्व्हवाला चाकू) खेचून बाहेर काढा. त्यानंतर तुम्ही त्याच्या मदतीने सहजपणे बॉटलचं झाकण उघडू शकता.
छोट्या चाकूचे काम
तुम्ही ट्रिपला असाल किंवा बाहेर असाल तर तुम्ही छोट्या चाकूने लिंबू, संत्रे, सफरचंद सारखी फळे कापू शकता. या चाकूने या गोष्टी सहज कापल्या जातात. त्याशिवाय तुम्ही टोकदार चाकूने नखांमधील घाण काढू शकता. पण असं करणं योग्य नाही. थोडा जरी निष्काळजीपणा झाला तर टोकदार चाकूची बोटाला जखम होऊ शकते. त्यामुळे कोणतंही काम करताना ते सावधानतेने केलं पाहिजे.
हा सुद्धा फायदा
नेल कटरचा तुम्ही कीचेन म्हणूनही वापर करू शकता. तुमच्या चाव्यांचा जुडगा नेल कटरमध्ये ठेवू शकता. प्रवासाच्या दरम्यान काही छोट्या छोट्या वस्तू हरवण्याची शक्यता असते. अशावेळी नेल कटरच्या छिद्राला त्या बांधल्यास त्या हरवण्याची शक्यता फार कमी असते. शिवाय ती वस्तू कुठे ठेवली होती हे पक्क लक्षात राहतं. नेल कटर कॅरी करण्यास उपयुक्त आहे. खिशात किंवा बॅगेत छोट्याश्या जागेतही नेल कटर ठेवता येतं. तोही नेल कटरचा मोठा फायदा आहे. सर्वच नेल कटरला छिद्र नसतं. इलेक्ट्रिक किंवा हार्ड एंड डिझाइनच्या नेल कटरला छिद्र नसतं. घरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या स्टिल नेल कटरलाच छिद्र असतं.
