GK: जापानमधील लोकं प्रत्येक समस्येवर पाचवेळा ‘Why’ का लावतात? यामुळे कशी मदत होते? जाणून घ्या

जापान हा विकसित देश आहे आणि प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यात त्यांचा हात कोण पकडू शकत नाही. जापानची कार्यप्रणाली पाहून अनेक देशांना त्याचं आश्चर्य वाटतं. असं कसं काय होऊ शकतं? एखाद्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कसा काय काढतात? तर त्या मागे 5 Why तंत्रज्ञान वापरलं जातं. कसं ते जाणून घ्या.

GK: जापानमधील लोकं प्रत्येक समस्येवर पाचवेळा Why का लावतात? यामुळे कशी मदत होते? जाणून घ्या
GK: जापानमधील लोकं प्रत्येक समस्येवर पाचवेळा 'Why' का लावतात? यामुळे कशी मदत होते? जाणून घ्या
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 11, 2026 | 4:24 PM

जापान हा उगवत्या सूर्याचा देश आहे. इतकंच काय प्रत्येक गोष्टीत परफेक्ट कसं असायला हवं ते या देशाकडून कळतं. बारीकसारीक प्रत्येक गोष्टींवर जापानमध्ये काम केलं जातं. त्यामुळे एखाद्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जातो. जापान कार्यकुशलता पाहून कोणत्याही देशाच्या नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येक जण आपल्या देशात समस्यांना सामोर जात असतो. अनेकांना तर समस्यांचं समाधान कधीच सापडत नाही. त्यामुळे जापान सारख्या देशाचा अभिमान वाटणं सहाजिकच आहे. जापानमध्ये प्रत्येक समस्येचं निकारण असंच होत नाही. त्यासाठी जापानी सरकार आणि तिथले नागरिक 5 Why आणि 5 S तंत्रज्ञान वापरतात. या दोन पद्धतीचा अवलंब करून समस्येचं मुळापासून निकारण केलं जातं. त्यामुळे एखादी मोठी अडचण सोडवण्यात मदत होते. चला जाणून घेऊयात कसं ते…

जापानमधील 5 Why म्हणजे काय?

जापानमध्ये गेल्या अनेक शतकांपासून काही परंपरा पाळल्या जात आहेत. त्याचा फायदा देश घडवण्यात होत आहे.  टोयोटा कंपनीचे संस्थापक साकिची टोयोडा यांची 5 Why हे तंत्र फार प्रचलित आहे. 5 Why म्हणजे ‘पाच वेळा का’.. या तंत्रामुळे एखाद्या समस्येचं मूळापासून निकारण करण्यास मदत होते. प्रत्येक ‘का’ मुळे समस्या सुटत जाते. उदाहरण द्यायचं झालं तर, एखाद्या कंपनीत एक मोठी मशिन बंद पडली. पहिल्यांदा का विचारलं गेल्यावर कळलं की ओव्हरलोडमध्ये मशीनचा फ्यूज उडाला. दुसऱ्यांदा का विचारल्यावर कळालं की बेयरिंगमध्ये आवश्यक लुब्रिकेशन ऑइल नव्हतं. तिसऱ्यांदा का विचारल्यावर समजलं की लुब्रिकेशन पंप योग्य रितीने काम करत नाही. चौथ्यांदा का विचारल्यावर पंपचा शाफ्ट घासल्याचं समोर आलं. तर पाचव्या का ला उत्तर मिळालं की पंपात कोणतंही फिल्टर नव्हतं. यामुळे कचरा अडकला होता.

समस्येच्या मूळावर घाव आणि कायमस्वरूपी तोडगा

पाच का मुळे कळलं की, फ्यूज उडण्याचं खरं पाचव्या का पासून सुरू झालं होतं. मशिनमध्ये फिल्टर नसल्याने समस्या वाढत गेली आणि त्याचा परिणाम फ्यूज उडण्यात झाला. या पाच का नंतर मूळ प्रश्न सोडवला गेला आणि मशिन व्यवस्थित केली गेली. तसेच भविष्यात ही समस्या पुन्हा उद्भवत नाही. तसेच वारंवार येणारे अडथळे कायमचे दूर झाले. यामुळे पैसा आणि वेळेची बचत झाली. त्याचा सकारात्मक परिणाम थेट उत्पादनावर झाला.

5 S पद्धत म्हणजे काय?

उत्पादकता वाढवण्यासाठी जापानची ही सर्वोत्तम पद्धत आहे. यातून सुरक्षित, व्यवस्थित आणि कोणत्याही चुकांशिवाय काम करण्याचं उद्दिष्ट आहे. या पद्धतीत पहिली पायरी ‘सेरी’.. म्हणजेच वर्गीकरण.. कामाच्या ठिकाणाहून अनावश्यक वस्तू त्वरित काढून टाकणे. दुसरी पायरी सेइटो म्हणजे एखादी वस्तू निश्चित ठिकाणी मांडणे. तिसरी पायरी सेइसो म्हणजे कामाच्या ठिकाणी नियमित स्वच्छता आणि उपकरणांचा सखोल तपासणी करणे. चौथी पायरी सेइकेत्सु म्हणजे पहिल्या तीन टप्प्यांचे काटेकोरपणे पालन करणे. पाचवी पायरी ही शित्सुके म्हणजे सर्व नियमांचं नेहमी पूर्ण शिस्तीने पालन करणे.

Follow Us