AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Blood: या देशात आवडीने प्यायलं जातं सापाचं रक्त! तरीही त्यांचा मृत्यू का होत नाही? जाणून घ्या

जगभरात सापांच्या जगाबाबत कुतुहूल आहे. भारतात तर सापांना दैवत मानलं जातं. सापांबाबत अनेक गोष्टीही प्रचलित आहेत. असं असताना एका देशात सापांचं रक्त प्यायलं जातं. त्या मागचं कारण आणि रक्त प्यायलानंतर मृत्यू का होत नाही? हे जाणून घ्या.

Snake Blood: या देशात आवडीने प्यायलं जातं सापाचं रक्त! तरीही त्यांचा मृत्यू का होत नाही? जाणून घ्या
Snake Blood: या देशात आवडीने प्यायलं जातं सापाचं रक्त! पण तरीही त्यांचा मृत्यू का होत नाही? जाणून घ्या Image Credit source: Pexels
| Updated on: Jun 10, 2026 | 5:17 PM
Share

सापाचं जग हे कायम चमत्कारिक मानलं गेलं आहे. विविध धर्म आणि पंथात सापांबाबत अनेक मिथके सांगितली गेली आहे. भारतात तर सापांची पूजा केली जाते. नागपंचमीला सापांना दूध नैवेद्य दाखवून त्यांचं पूजन केलं जातं. साप हा शेतकऱ्यांचा मित्रही मानला गेला आहे. शेतीचं नुकसान करणाऱ्या उंदरांचा कर्दनकाळ आहे आणि शेतीचं त्यांच्यापासून संरक्षण करतो. भारतात असं सर्व सापांबाबत आहे. पण जगातील अनेक देशात सापांबाबत वेगवेगळ्या प्रथा आणि भलतंच काही केलं जातं. काही आशियाई देशात तर सापांपासून औषध निर्मिती केली जाते. चीन, व्हिएतनाम, हाँगकाँग आणि इंडोनेशियासारख्या देशात सापाचं रक्त, मास आणि सापापासून तयारी केलेली वाईनही प्यायली जाते. इतकंच काय तर सापांच्या रक्तापासून तयार केलेलं ड्रिंक्सचं सेवन आवडीने केलं जातं. हो तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. सापाचं रक्त प्यायलं जातं. मग प्रश्न असा पडतो की सापाच्या रक्तातून विष अंगात पसरत नाही का?

सापाचं रक्त प्यायलाने मानवाचा मृत्यू का होत नाही?

साप विषारी असतो यात काही दुमत नाही. त्यामुळे त्याच्या शरीरात विष असतं असा एक समज आहे. पण साप चावला तर आणि तरच त्याचं विष अंगात पसरतं. सापाचं विष हे प्रथिने आणि एन्झाइम्सपासून तयार होतं. पण सापाचं रक्त हे विषापेक्षा वेगळं असते. सापाच्या रक्तात विषारी ग्रंथी नसल्याने ते पोटात गेल्याने सहसा विषबाधा होत नाही. पण रक्तात जंतू किंवा बॅक्टेरिया असल्यास संसर्ग होऊ शकतो. सापाचं रक्त चीन, इंडोनेशिया आणि व्हिएतनामसारख्या देशात स्टॅमिना वाढवण्यासाठी औषध म्हणून प्यायलं जातं. इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जकार्तामध्ये तर सकाळी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सापांच्या अनेक प्रजातींचं रक्त विकलं जातं.

इंडोनेशियात  रक्ताची मागणी जास्त असल्याने सापांची शेती केली जाते.  त्यात किंग क्रोबाला सर्वाधिक पसंती असल्याचं बोललं जातं. कारण किंग कोब्राला पकडलं सोपं नसतं. त्यामुळे त्याची मागणी या देशात खूप आहे आणि त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. काही लोकांना सापाचं मास किंवा रक्त थेट पिणं शक्य होत नाही. अशा व्यक्तींसाठी सापाचं रक्त आणि मासापासून तयार केलेली औषध दिली जातात. ही औषधं लोशन किंवा टॅबलेटच्या स्वरूपात असतात.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला