Todays Gold Rate : ज्याची भीती तेच झाले, धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या भावात मोठे उलटफेर, थेट सोने..

Today Gold Rates : सोने आणि चांदीच्या दरात मोठे उलटफेर झाले. आज धनत्रयोदशीच्या दिवशी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. त्यातच आजचा सोने आणि चांदीचा भाव पुढे आला.

Todays Gold Rate : ज्याची भीती तेच झाले, धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या भावात मोठे उलटफेर, थेट सोने..
Today Gold Rates
| Updated on: Nov 06, 2026 | 9:27 AM

आज धनत्रयोदशी असून सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. आज सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव चांगलेच कोसळताना दिसत आहेत. ज्यामुळे यंदाच्या धनत्रयोदशीला विक्रमी सोने खरेदी होण्याचा अंदाज आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव घसरत होते. आता सोन्याच्या भावात तेजी दिसून आली. आजही सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली. मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 46 हजार 30 आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 33 हजार 860 रूपये आहे. दिल्लीत आज सोन्याचा भाव 1 लाख 46 हजार 180 आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 34 हजार 010 आहे.आजच्या दिवशीच सोन्याचे भाव धाडकन वाढल्याचे बघायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव घसरले होते.

त्यातच आता पुन्हा सोने सुसाट सुटल्याचे बघायला मिळतंय. कालपेक्षा 2 हजारांनी सोन्याच्या भावात वाढ झाली. सोने त्याच्या उच्चांकापेक्षा अजूनही स्वस्त आहे. आज लोकांकडून सोने खरेदी मोठ्या प्रमाणैेत केली जाईल. चांदीच्या किंमतीमध्येही वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. 29 ते 31 ऑक्टोबरदरम्यान चांदीच्या किंमती कोसळताना दिसल्या.

Loading...

20000 हजारांनी चांदीच्या किंमती घसरल्या होत्या. आता चांदीचेही भाव तेजीत आल्याचे बघायला मिळतंय. मागील काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, सोने आणि चांदीचे भाव अजून पुढील काही दिवसात कोसळतील. मात्र, जागतिक बाजारात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोने पुन्हा तेजीत आल्याचे बघायला मिळत आहे. भारतात दिवाळीत मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते.

आज सराफा बाजारात लोकांची मोठी गर्दी ही बघायला मिळेल. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ असल्याचे बोलले जाते. त्यातच सोने तसे मागील काही महिन्यांच्या विचार करता स्वस्त झाले. इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे भाव कोसळताना दिसले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले होते आणि सोने कोसळू लागले. त्यातच आता पुन्हा सोने तेजीत आले. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला निवडणुकीत मोठा पराभवाचा सामना करावा लागला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us