युद्धामुळे हल्ली चर्चेत असलेला देश यूक्रेन, अन्य काही गोष्टींमुळे देखील ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

| Updated on: Feb 22, 2022 | 12:36 AM

सध्या रशिया आणि यूक्रेन हे दोन्ही देश युद्ध कारणामुळे चर्चेत आहे परंतु युक्रेन बाबतीत अश्या काही गोष्टी आहेत, ज्या प्रत्येकाने जाणून घ्यायला हव्यात.या सगळ्या गोष्टींमुळे युक्रेन देशाचे वेगळेपण प्रकर्षाने दिसून येत आहे.

युद्धामुळे हल्ली चर्चेत असलेला देश यूक्रेन, अन्य काही गोष्टींमुळे देखील ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!
Follow us on

नवी दिल्ली : यूक्रेन आणि रशिया (Russia Ukraine Crisis) या दोन्ही देशांमधील वाद अनेक दिवसांपासून चालू आहे. युक्रेन या देशांबद्दल अनेक बातम्या सुद्धा माध्यमातून दाखविण्यात येत आहेत. हल्ली सगळीकडे युक्रेन व रशिया या दोन्ही देशांबद्दलची चर्चा जोर धरत आहे. असे म्हटले जात आहे की, युक्रेन या देशाला तिन्ही बाजूने रशियन सेनेने (Russia Army) घेरले आहे आणि आता रशिया या देशावर आक्रमण करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेला आहे. सेटेलाइट च्या माध्यमातून सुद्धा युक्रेनवर नजर ठेवण्यात आलेली आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध बद्दलच्या (War news) अनेक बातम्या तुम्ही माध्यमांवर पाहिल्या व ऐकल्या असतील किंवा सोशल मीडियावर याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुद्धा जाणून घेतली असेल. या वादापूर्वी सुद्धा युक्रेनला देशभरामध्ये ओळखले जात होते. आज आम्ही तुम्हाला युक्रेन बद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. जी माहिती जाणून घेतल्यावर तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल. सेवियत संघामध्ये या देशाची विशेष अशी ओळख आहे. हा देश आपले वेगळेपण वेगवेगळ्या गोष्टीतून सिद्ध करतो आणि याच गोष्टीमुळे अनेकदा या देशाबद्दल वेगवेगळ्या स्तरातून कौतुक सुद्धा अनेकदा केले गेले, चला तर मग जाणून घेऊया यापूर्वीसुद्धा युक्रेन देश नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे प्रसिद्ध होता त्याबद्दल…

दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठा देश

यूक्रेन 1990 मध्ये सोवियत संघापासून वेगळा झाला आणि या देशाची एक स्वतंत्र देश म्हणून विशेष ओळख झाली. हा देश रशिया नंतर युरोपातील सर्वात मोठा देश आहे. युक्रेनमध्ये ग्रामीण भागात राहणारी 30 टक्के लोकसंख्या राहते. शेतीच्या बाबतीत युक्रेन जगातील तिसर्‍या क्रमांकावर असलेला देश आहे.

सर्वाधिक ख्रिश्चन लोकसंख्या असलेला देश

युक्रेन या देशांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ख्रिश्चन समुदायाची आहे.या देशात ख्रिश्चन धर्मीय लोकांचे वर्चस्व पाहायला मिळते. त्यानंतर मुस्लिम लोकांची संख्या देखील आपल्याला या देशांमध्ये दिसून येते. हा देश विमान बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

शिक्षणात आहे पुढे

युक्रेन या देशातील 99.8 टक्के लोक साक्षर आहेत. हा देश शिक्षणाच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

येथील मॅक्डोनाल्ड सुद्धा आहे प्रसिद्ध

युक्रेन या देशातील मॅक्डोनल्ड खूपच प्रसिद्ध आहे. या देशामध्ये सर्वात तिसरा बीजी मॅक्डोनल्ड आहे. या देशांमध्ये एक मॅक्डोनेल असा आहे की, जेथे खूप सारे लोक जमा होतात आणि याचा टॉप फाइव्ह मॅकडी मध्ये याचा समावेश केला जातो.

मुलींमुळे आहे लोकप्रिय

जगातील सर्वात सुंदर मुलींचा देश म्हणून युक्रेनला ओळखले जाते. येथील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आणि प्रत्येक कार्यात महिलांचा समान वाटा आपल्याला पाहायला मिळतो. घरातील प्रत्येक कामापासून ते संसदेपर्यंत या देशातील महिला पुरुषांसोबत काम करून आपल्या जबाबदारी पार पाडत आहेत. अनेकदा या देशातील महिलांचे यामुळेच कौतुक देखील केले गेले आहे.

इतर बातम्या :

Pegasus : पेगासस हेरगिरी प्रकरण : समितीचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर

मिसळीवर ताव मारल्यानंतर रोहित पवारांच्या पुरणपोळ्यांवरुन फडणवीसांना, तर बिलावरुन भाजप नेत्यांना जोरदार टोला!