साप नव्हे तर घराजवळ असणाऱ्या या प्राण्याचे विष सर्वात महाग, 1 लिटरची किंमत 100 कोटी!

Scorpion Venom : सापाच्या विषापेक्षाही काही कीटकांचे विष अधिक महाग असतं. विशेष म्हणजे हा काही दुर्मिळ जीव नाही. तो आपल्या आजूबाजूलाही कुठे ना कुठे आढळतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

साप नव्हे तर घराजवळ असणाऱ्या या प्राण्याचे विष सर्वात महाग, 1 लिटरची किंमत 100 कोटी!
scorpion venom costs rs 100 crore
Image Credit source: Google
| Updated on: Aug 31, 2026 | 6:24 PM

आपल्या अनेकांच्या घराच्या आसपास सापांसह अनेक विषारी प्राणी आढळतात. साप आणि त्याच्या विषाबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र, सापाच्या विषापेक्षाही काही कीटकांचे विष अधिक महाग असतं, हे तुम्हाला माहिती आहे का? विशेष म्हणजे हा काही दुर्मिळ जीव नाही. तो आपल्या आजूबाजूलाही कुठे ना कुठे आढळतो. अनेकदा तो घरांमध्येही दिसून येतो. या जीवाचं विष इतकं महाग आहे की, एखाद्याकडे त्याचं एक लिटर विष असेल तर त्याला तब्बल 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळू शकते. हा जीव नेमका कोणता आहे आणि त्याचं विष इतकं महाग का आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हा खतरनाक जीव कोणता?

आपण ज्या प्राण्याच्या विषाबद्दल बोलत आहोत त्याचं नाव विंचू आहे. विंचवाच्या विषाची किंमत खूप जास्त असते. बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, विंचवांच्या प्रजातींमध्ये डेथस्टॉकर हा विंचू सर्वाधिक धोकादायक मानला जातो. या विंचवाच्या सुमारे एका गॅलन म्हणजेच 3.8 लिटर विषाची किंमत तब्बल 39 दशलक्ष डॉलर, म्हणजेच जवळपास 320 कोटी रुपये इतकी आहे. म्हणजेच एका लिटर विषाची किंमत जवळपास 100 कोटी रुपये होते.

सर्वात विशेष बाब म्हणजे इच्छा असूनही तुम्ही एक गॅलन विंचवाचं विष विकत घेऊ शकत नाही. बाजारात हे विष अत्यंत कमी प्रमाणात विकलं जातं. केवळ 130 डॉलर म्हणजेच जवळपास 10 हजार रुपयांना विषाचा एक थेंब मिळतो. विशेष म्हणजे हा थेंब साखरेच्या एका कणापेक्षाही लहान असतो.

विंचवाचं विष इतकं महाग का?

अनेकांना प्रश्न पडला असेल की, विंचवाच्या विषाची किंमत एवढी जास्त का आहे? यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्याची दुर्मिळता आणि ते मिळवण्याची कठीण प्रक्रिया. विंचवांचं विष हाताने, एक-एक करून काढावं लागतं. एक विंचू एका वेळी जास्तीत जास्त 2 मिलीग्रॅम विष देऊ शकतो. त्यामुळे एका गॅलन म्हणजे 3.8 लिटर विष मिळवण्यासाठी एकाच विंचवाकडून तब्बल 26 लाख 40 हजार वेळा विष काढावं लागेल.

या विषाच्या प्रचंड किंमतीमागे त्याचा वैद्यकीय वापर हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. विंचवाच्या विषामध्ये क्लोरोटॉक्सिन नावाचा घटक आढळतो. हा घटक मेंदू आणि मणक्याच्या कर्करोगाच्या पेशींशी जोडला जाऊ शकतो. त्यामुळे कर्करोगावरील संशोधन आणि निदानामध्ये या विषाचा वापर केला जात असल्याचे सांगितले जाते.

Follow Us