AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Devendra Fadnavis | डिलिमिटेशन विधेयकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, थेट म्हणाले...

CM Devendra Fadnavis | डिलिमिटेशन विधेयकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, थेट म्हणाले…

| Updated on: Aug 31, 2026 | 5:36 PM
Share

देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी २०२९ पर्यंत महिला आरक्षण आणतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसवर दुटप्पी भूमिकेचा आरोप करत, २०१३ मध्ये महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देऊनही आता विरोध करत असल्याचे म्हटले आहे. मोदी सरकार महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२९ पर्यंत महिला आरक्षण लागू करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. महिला आरक्षण विधेयावरील चर्चेदरम्यान त्यांनी विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला. फडणवीस यांच्या मते, कोविडमुळे जनगणना पुढे ढकलली गेली, त्यामुळे तात्पुरता मार्ग म्हणून मागील जनगणनेचा आधार घेणारे विधेयक आणले होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसने त्याला विरोध करून विधेयक पाडले. महिला आरक्षण देण्याची त्यांची इच्छा नसल्याने हे सर्व केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. इतकेच नाही तर त्यांनी राहुल गांधींच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाबबात सांगितलं. ते म्हणाले, राहुल गांधींच्या कार्यक्रमातील एका मुलीने घरी जाऊन फेक्ट चेक केलं तीने तपास केला आभ्यास केल्यानंतर तिच्या लक्षात आलं. हा कार्यक्रम ‘छात्र की गुंज’ नाही तर, झुठ की गुंज होता. तीने वेबसाईट बनवली अन् सर्व प्रश्नांचे पुरावे मांडले. ‘झुठ की गुंज’ नावाची तिची वेबसाइट काँग्रेस शासीत राज्याने बंद केली तसेच तिच्यावर कारवाई केली, असं फडणवीस म्हणाले.

मोदी सरकारने महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्यासाठी कायदा केला आहे आणि तो प्रभावीपणे लागू करण्यासाठी पंतप्रधान मोदी कटिबद्ध आहेत. समाजातील अनेक सुधारणांची मुहूर्तमेढ पुण्याने रोवली आहे. त्याच पुण्यात महिला आरक्षणाबाबत दिशाभूल करण्याचे काम काही  लोकांकडून होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी एकदा जे ठरवले ते पूर्ण करून दाखवतात, त्यामुळे महिला आरक्षण लवकरच लागू होईल, असे फडणवीस यांनी ठामपणे नमूद केले.

Published on: Aug 31, 2026 05:31 PM

Follow Us