Snake Facts: केवळ मुंगुसच नाही! या 5 प्राण्यांवर होत नाही सापाच्या विषाचा अजिबात परिणाम

Snake Facts Mongoose: साप आणि मुंगूसाची लढाई आपल्याला माहिती आहे. सापाच्या विषाचा मुंगूसावर परिणाम होत नाही. पण केवळ मुंगूसच नाही तर या 5 प्राण्यांवरही सापाच्या विषाचा परिणाम होत नाही. कोणते आहेत ते प्राणी?

Snake Facts: केवळ मुंगुसच नाही! या 5 प्राण्यांवर होत नाही सापाच्या विषाचा अजिबात परिणाम
या 5 प्राण्यांवर होत नाही सापाच्या विषाचा अजिबात परिणाम
| Updated on: Nov 14, 2026 | 1:35 PM

Snake Facts Mongoose: जगाच्या पाठीवर सापाच्या 4 हजारांहून अधिक सापाच्या विविध प्रजाती आहे. त्यापैकी काही साप विषारी तर काही बिनविषारी असतात. पण साप पाहून तो विषारी की बिनविषारी हे समजत नसल्याने त्याला मारण्यासाठी अगोदर सर्वच जण धावतात. सापाच्या विषाने मृत्यू ओढावतो, त्यामुळे साप दिसला की त्याला पकडणे अथवा मारणे हाच प्रयोग केला जातो. मुंगूसावर सापाचा परिणाम होत नाही, हे आपल्याला माहिती आहे. पण जगातील या 5 प्राण्यांवरही सापाच्या विषाचा कोणताही परिणाम होत नाही. त्यांच्या शरीरात सापाच्या विषाविरुद्ध लढण्याची नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते.

या प्राण्यांवर अजिबात होत नाही विषाचा परिणाम

Loading...

मुंगुसाच्या शरीरातील नर्व्ह सेल रिसेप्टर्समदील विशेष बदलांमुळे सापाच्या विषाचा त्याच्या चेतासंस्थेवर कोणताही परिणाम होत नाही. तर त्याच्या अंगावरील दाट केस सापाच्या दातांना शरीरात खोलवर पोहोचू देत नाहीत. तसेच या पाच प्राण्यांच्या विशिष्ट शरीर रचनेमुळे त्यांच्यावरही सापाच्या विषाचा परिणाम होत नाही.

1. हनी बॅजर (Honey Badger) : हा प्राणी आफ्रिकेत आढळतो. त्याची त्वचा अत्यंत जाड आणि सैल असते. यामुळे सापाने दंश केला तरी त्या विषाचा त्याच्यावर सहजासहजी परिणाम होत नाही. हा प्राणी ब्लॅक मांबासारख्या अत्यंत विषारी सापांचीही शिकार करतो.

2. सेक्रेटरी बर्ड (Secretary Bird): हा पक्षी आफ्रिकेत आढळतो. पक्षी सापाला आपल्या लांब आणि मजबूत पायाने चिरडतो. सापाने दंश केला तरी त्याचा या पक्षावर कोणताही परिणाम होत नाही.

3. किंग स्नेक (King Snake): हा एक साप आहे. पण तो बिनविषारी आहे. उत्तर अमेरिकेत आढळणारा हा साप अत्यंत जहाल अशा रॅटल स्नेकची सहज शिकार करतो. त्याला खाऊन टाकतो. याच्या शरिरात सापाच्या विषाविरुद्ध लढण्याची नैसर्गिक प्रतिकारशक्ती असते.

4. हेजहॉग: हा सस्तन प्राणी खतरनाक सापांशी पंगा घेतो. याच्याही शरिरात सापाच्या विषाविरुद्ध लढण्याची नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते. त्याच्यावर सापाच्या विषाचा कोणताही परिणाम होत नाही.

5. परेंटी मॉनिटर: ऑस्ट्रेलियात आढळणारी ही जगातील सर्वात मोठी पाल आहे. जगातील सर्वात विषारी मानल्या जाणाऱ्या इनलँड टायपन सापाच्या पिलांची आणि लहान सापांची ही पाल शिकार करते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us