Snake Fact: सापाचं विष सोन्यापेक्षा महाग! 1 ग्रॅम विषाच्या किंमतीत किती सोनं खरेदी करता येणार?

Snake Venom Price: साप चावल्यावर सर्वात आधी अँटीव्हेनम लस, अँटीडॉट घेण्याचे म्हणजे विषविरोधी औषधाची आठवण येते. गोल्डन आवरमध्ये अँटीडॉट मिळाल्यावर रुग्णाचे प्राण वाचतात. सापाच्या विषावर उतारा मिळतो.

Snake Fact: सापाचं विष सोन्यापेक्षा महाग! 1 ग्रॅम विषाच्या किंमतीत किती सोनं खरेदी करता येणार?
सापाचं विष सोन्यापेक्षा महाग! 1 ग्रॅम विषाच्या किंमतीत किती सोनं खरेदी करता येणार?
| Updated on: Oct 29, 2026 | 1:38 PM

Snake Venom Price: साप चावल्यावर आता वैदू अथवा मांत्रिकाकडं जाण्याऐवजी अनेक जण थेट सरकारी अथवा खासगी रुग्णालय गाठतात. समाजात जागरूकता वाढली आहे. अँटीव्हेनम लस, अँटीडॉट घेण्याचे म्हणजे विषविरोधी औषध तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. पण त्यासाठी सापाचं विष वापरले जाते. वैद्यकीय आणि औषधी निर्माण क्षेत्रात या विषाची मोठी मागणी असते. या विषाची किंमत सोन्यापेक्षा महाग असते. जगात 10 टक्के सापाच्या प्रजाती विषारी आहेत.

असे काढले जाते सापाचे विष

Loading...

साप चावल्यानंतर लवकर उपचार न मिळाल्यास मृत्यू ओढावतो. साप चावण्याचे प्रमाण पाहता अँटीडॉट, विषविरोधी औषध तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. सापाच्या डोक्याच्या मागील भागातील ग्रंथींमध्ये विष तयार होतं. साप चावल्यानंतर विष समोरच्याच्या शरीरात प्रवेश करतं. जेव्हा विषविरोधी औषधं तयार केलं जातं. त्यावेळी सापाचं विष अत्यंत सावधपणे काढलं जातं. एखाद्या काचेच्या गोलदंडाला साप चावतो, तेव्हा त्याचे विष भांड्यात जमा होतं. सापाच्या विविध प्रजातीनुसार, 1 मिलीग्रॅम ते 850 मिलिग्रॅमपर्यंत सापाचं विष असू शकतं. काहा सापांचं विष हे वेदनाशामक अथवा इतर औषधी कामासाठी वापरलं जातं. त्यात अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल औषधांचा समावेश असतो.

सोन्यापेक्षा सापाचे विष महाग

1 ग्रॅम विषाची किंमत 4,000 रुपये डॉलरपर्यंत जाऊ शकते. तर काही विशिष्ट प्रजातींच्या सापाचे विष 12 ते 13 हजार डॉलर प्रति ग्रॅमपर्यंत विक्री होऊ शकते. म्हणजे 1 ग्रॅम सापाच्या विषात 24 कॅरेट 75 ते 80 ग्रॅम सोने सहज खरेदी करता येते. म्हणजे बाजारभावाप्रमाणे 75 ग्रॅम सोन्यासाठी अंदाजे 10 लाख 79 हजार मोजावे लागू शकतात. तर 80 ग्रॅम सोन्यासाठी 11 लाख, 51 हजार रुपये मोजावे लागू शकतात. त्यानुसार या विषाची किंमत किती आहे हे समजून येते. किंग कोब्रा, कोरल ब्रान यासारख्या सापाचे विष व्हेनम तयार करण्यासाठी अत्यंत गुणकारी मानल्या जाते.

तर आता सापाच्या विषाच्या संवर्धनासाठी आणि संशोधनासाठी पावलं टाकण्यात आली आहे. चांगल्या प्रतीच्या, दर्जाच्या विषासाठी ई-लिलाव प्रक्रिया होत आहे. त्यासाठी मोठी किंमत मिळत आहे. यामुळे सापाचे विष अत्यंत महाग झाले आहेत. त्याला सोन्यासारखा नाही तर सोन्यापेक्षा अधिक भाव मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us