
भारतात अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत, ज्यांच्याबद्दल बऱ्याच रंजक अख्यायिका, कथ ऐकायला मिळतात. काही मंदिरांमध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी घडणारे चमत्कारही पाहिले असतील. असंच एक मंदिर आहे गुजरातमधील वडोदरा येथे. हे मंदिर म्हणजे स्तंभेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर महादेवाच्या प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते दिवसातून दोनदा अदृश्य होतं असं म्हटलं जातं. इतकेच नाही तर समुद्राच्या लाटा मंदिरात स्थापित शिवलिंगाचा जलाभिषेक देखील करतात. त्यामुळे या मंदिराची चर्चा सर्वत्र आहे. मंदिराची ही खासियत भाविकांना आकर्षित करते. पण या मंदिराच्या अदृश्य होण्यामागे नेमकं काय रहस्य आहे ते जाणूवन घेऊयात.
हे मंदिर दिवसातून दोनदा गायब होते
स्तंभेश्वर महादेव मंदिर सुमारे 200 वर्षांपूर्वी शोधण्यात आलंय. त्यातील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे ते दिवसातून दोनदा अदृश्य होतं. आता यामागे कोणतीही चमत्कारिक घटना नाही पण निसर्गाची कमाल आहे. प्रत्यक्षात महादेवाचे हे प्राचीन मंदिर समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर आहे. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा समुद्रात उंच आणि जोरदार लाटा उठतात तेव्हा मंदिर पूर्णपणे त्या लाटांमध्ये बुडते. या समुद्राच्या लाटा मंदिरात असलेल्या शिवलिंगाचा जलाभिषेक देखील करतात. निसर्गाची ही सुंदर घटना दिवसातून दोनदा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दिसते. म्हणून मंदिर दिवसातून दोनवेळा गायब होतं असं म्हटलं जातं.
मंदिरात कसे पोहोचायचे
महादेवाचे हे अनोखे मंदिर गुजरातची राजधानी गांधीनगरपासून सुमारे 175 किमी अंतरावर असलेल्या जंबुसरच्या कंबोई गावात आहे. महादेवाच्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिरापासून त्याचे अंतर सुमारे पंधरा किलोमीटर आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सोमनाथ मंदिराला भेट देणार असाल तर तुम्ही त्याच्या जवळ असलेल्या प्राचीन स्तंभेश्वर महादेवालाही भेट देऊ शकता.
त्यामुळे हे मंदिर दिवसांतून गायब होते ही अंधश्रद्धा नसून ती निसर्गाची कमाल आहे. हे मंदिर त्या लाटांमुळे लपले जाते. आणि ते खरोखरच अदृश्य झाल्यासारखे वाटते. पण या मंदिराची अख्यायिका प्रसिद्ध असल्याने देशभरातून लोक या मंदिराला भेट द्यायला येतात.