AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचा मोठा निर्णय, देवेंद्र फडणवीसांची थेट पोस्ट, भारत अमेरिका मैत्रीच्या..

भारत आणि अमेरिकेत मागील काही दिवसांपासून तणावाची स्थिती बघायला मिळाली. टॅरिफच्या मुद्द्यात दोन्ही देशांमधील संबंध ताणले होते. त्यामध्येच आता अमेरिकेने मोठा निर्णय घेत भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेचा मोठा निर्णय, देवेंद्र फडणवीसांची थेट पोस्ट, भारत अमेरिका मैत्रीच्या..
Devendra Fadnavis
| Updated on: Feb 03, 2026 | 8:10 AM
Share

मागील काही दिवसांपासून अमेरिका भारतावर अनेक निर्बंध लादताना दिसली. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. ज्यानंतर भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली. भारताने रशियाकडून तेल खरेदी जवळपास थांबवली आहे. मात्र, यानंतर अमेरिका भारतावरील टॅरिफ कधी कमी करणार असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. या टॅरिफच्या मुद्द्यात भारत आणि अमेरिकेत व्यापार करार होऊ शकत नव्हते. अखेर अमेरिकेने थेट भारतावरील टॅरिफ कमी केला. भारत आणि अमेरिकेत नक्की काय मैत्री आहे हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले. भारत आणि अमेरिकेचे संबंध टॅरिफमुळे तणावात असताना पाकिस्तानने थेट याचा फायदा घेत अमेरिकेसोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला. शिवाय भारतावर अमेरिकेने लावलेल्या मोठ्या टॅरिफच्या विरोधात चीन देखील मैदानात आला होता. चीनने या टॅरिफला विरोध केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली असून 50 टक्के टॅरिफ थेट 18 टक्क्यांवर आणला. हा अत्यंत मोठा दिलासा भारतीय व्यापाऱ्यांना मिळाला. 50 टक्के टॅरिफ भारतीय वस्तूंवर लावल्याने भारतातून अमेरिकेत वस्तू पाठवणे कठीण झाले होते. यादरम्यान भारताने अनेक देशांसोबत महत्वाचे व्यापार करार केले. शेवटी भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा मोठा निर्णय अमेरिकेने घेतला.

अमेरिकेने भारतावर टॅरिफ कमी केल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. मैत्रीचा नवीन अध्याय म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे.

जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे. जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य टॅरिफ दर मिळणार आहे. यातून भारत अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नूतन आणि उत्साहवर्धक संधींचे द्वार खुले करेल आणि ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर अशी बाब ठरेल.

महाराष्ट्र हे कायम निर्यातीत अग्रेसर असलेले राज्य आहे. त्यामुळे हा करार आपल्या राज्यातील व्यवसायासाठी नवीन क्षितिज खुले करेल. डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी