
तुमचा आहार जर सकस असेल तर चांगल्या आरोग्याचे ते लक्षण आहे.आपण जे काही खातो त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. आजकालचे काही खाद्य पदार्थ तुमचे आरोग्य बिघडवू शकतात. आपण अल्ट्रा प्रोसेस्ड फूड संदर्भात बोलत आहोत. हे फूड्स तसे तर सर्वांसाठीच योग्य नाहीत. परंतू त्यापासून पुरुषांना सर्वाधिक नुकसान होते. अलिकडे झालेल्या संशोधनात अल्ट्रा प्रोसेस्ड फूड पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर मोठा विपरित परिणाम करते. या फूड्सच्या जादा सेवनाने स्पर्म काऊंट कमी होण्याचा धोकाही असतो. अल्ट्रा -प्रोसेस्ड फूडच्या सेवनाने कमी प्रोसेस्ड डायट्सच्या तुलनेत अधिक वजन वाढते, मग भलेही त्यात कॅलरीचे प्रमाण समान असो.
अल्ट्रा प्रोसेस्ड फूडची चव चांगली असली तरी आरोग्यासाठी ते विषापेक्षा कमी नाही. एका स्टडीत खुलासा झाला आहे की अल्ट्रा प्रोसेस्ड फूड पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम करते. यामुळे पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावरही परिणाम होतो. जर्नल सेल मेटाबॉलिझ्मची स्टडीला इकॉनॉमिक्स टाईम्सने प्रसिद्ध केले आहे.
सर्वात योग्य डाटा प्राप्त करण्यासाठी संशोधकांनी 43 पुरुषांचा सर्वे केला आहे. ज्या पुरुषांच्या वय, वजन, लांबी, एक्टीव्हीटी लेव्हलनुसार अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड खाल्ले, त्यांचे वजन आणि बॉडी फॅट त्या लोकांच्या तुलनेत जास्त वाढले ज्यांनी हेल्दी फूड खाल्ले. यांच्या मेटाबॉलिक रेटवर देखील परिणाम झाला. या स्टडीसाठी 20 ते 35 वर्षांच्या वयाचे 43 हेल्दी पुरुषांचा समावेश केला. ज्यांनी तीन आठवड्यापर्यंत दोन्ही डाएट्सचे पालन केले. ज्यात तीन महिन्यांचे ‘वॉशआऊट’ अंतर होते.
अहवालाच्या मते त्यांनी दोन्ही गटात वाटात वाटले. एक गटाला तीन आठवड्यापर्यंत जास्त अल्ट्रा- प्रोसेस्ड फूड आणि तीन आठवड्यांपर्यंत अनप्रोसेस्ड फूड दिलेले आहेत. दुसऱ्या ग्रुपला गरजेपेक्षा 500 कॅलरी जादा हाय कॅलरी फूड खायला दिले. यात आश्चर्यचकीत खुलासा झाला. या दरम्यान पाहिले गेले की अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचा परिणाम पुरुषांची प्रजनन क्षमतेवर पडला.
स्टडीमध्ये असे आढळले की जास्त अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने पुरुषांच्या स्पर्म काऊंट कमी होऊ शकते. यामुळे त्यांची फर्टीलिटीवर देखील असर पडतो. तर हाय -कॅलरी, अल्ट्रा-प्रोसेस्ड डाएट घेणारे पुरुषात फॉलिकल-स्टीमुलेटिंग हार्मोन (FSH)चे लेव्हल कमी आढळली, जे स्पर्म बनवण्यासाठी खूप गरजेचे असते.
यात पुरुषांत स्पर्म मोटिलिटी (sperm motility) देखील कमी झाली. असे म्हटले जाते की याचे कारण एक केमिकल cxMINP होऊ शकते. हे एंडोक्राइन डिसरप्टर्स (endocrine-disruptors) हार्मोन लेव्हल मध्ये मोठे बदल आणू शकते. यामुळे अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडने वजन वाढण्यासोबत सेक्स हार्मोन्सवरही वाईट परिणाम होतो.