AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran US Israel War Update : युद्धात इराणचं रौद्र रुप पाहून ट्रम्प यांचे पाय डगमगले, अमेरिका घाबरली, हे घ्या त्याचे दोन ढळढळीत पुरावे

Iran US Israel War Update : 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात सैन्य कारवाई सुरु केली. त्यानंतर इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद केलं. तिथून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले केले. त्यामुळे हा जलमार्ग जवळपास बंद आहे.

Iran US Israel War Update : युद्धात इराणचं रौद्र रुप पाहून ट्रम्प यांचे पाय डगमगले, अमेरिका घाबरली, हे घ्या त्याचे दोन ढळढळीत पुरावे
USS Tulsa
| Updated on: Mar 17, 2026 | 10:28 PM
Share

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरु असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकन नौदलाची भूसुरुंग शोधणारी आणि हटवणारी तीन पैकी दोन जहाजं मिडिल ईस्टपासून लांब दिसली आहेत. त्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. USS टुल्सा आणि USS सांता बरबरा या दोन जहाजांना मलेशियाच्या पेनांग राज्यातील नॉर्थ बटरवर्थ कंटेनर टर्मिनलवर पाहण्यात आलय. या जहाजांचा बेस बहरीमध्ये आहे. तिथून ती 3500 मैल अंतरावर दिसली आहेत. सामान्यत: ही जहाजं मिडिल ईस्टमध्ये तैनात असतात. ही जहाजं US नौदलाच्या पाचव्या फ्लीटचा भाग आहेत.

या जहाजांना तिथून हटवून मलेशियात का पाठवण्यात आलय? ते अजून स्पष्ट नाहीय. अमेरिकी सेंट्रल कमांड आणि इंडो-पॅसिफिक कमांडने अजून यावर काही उत्तर दिलेलं नाही. पेंटागनने सुद्धा थेट काही सांगितलेलं नाही. या विषयाला इंडो-पॅसिफिक कमांडकडे पाठवलं आहे. ही दोन्ही जहाजं इंडिपेंडेंस क्लासची आहेत. समुद्रात पेरण्यात आलेली भूसुरुंग शोधून ती हटवण्याची खास सिस्टिम या जहाजांमध्ये आहे. स्फोटकांचा शोध लावून ती निष्क्रिय करण्यासाठी अंडरवॉटर ड्रोन, सोनार आणि हॅलिकॉप्टरचा वापर होतो.

एक्सपर्ट्सचं म्हणणं काय?

इराणने बहरीनमध्ये ड्रोन, मिसाइल हल्ले केले आहेत. कदाचित ते या जहाजांना लक्ष्य करु शकतात ही भिती असू शकते. तिसरं जहाज USS कॅनबरा अजूनही आखातामध्ये असल्याचं सांगण्यात येतय. आधी अमेरिकेकडे चार जुनी एवेंजर क्लासची भूसुरुंग हटवणारी जहाजं होती. पण मागच्यावर्षी ती काढून टाकण्यात आली. आता ही नवीन जहाजं त्या ठिकाणी हे काम करणार आहेत. काही एक्सपर्ट्सनुसार या नव्या जहाजांची टेक्निक अजून खऱ्या युद्धात सिद्ध झालेली नाही. ही जहाजं आकारमानात मोठी आहेत.

ट्रम्प यांनी कोणाकडे मदत मागितली?

ब्रिटनचे ऊर्जा मंत्री एड मिलिबँड म्हणाले की, गरज पडल्यास आमचा देश भूसुरुंग हटवणारे ड्रोन्स पाठवू शकतो. जपान आणि ऑस्ट्रेलियाने स्पष्ट शब्दात सांगितलय की, ते सध्या हॉर्मुज स्ट्रेटमध्ये सैन्य संसाधन पाठवण्यावर विचार करत नाहीयत. अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि यूकेकडे हॉर्मुझ स्ट्रेट ओपन करण्यासाठी मदत मागितली होती.

इराणने किती हजार भूसुरुंग पेरले असतील?

गोपनीय संस्थांच्या अंदाजानुसार इराणने जहाजांचा मार्ग रोखण्यासाठी समुद्राच्या तळाशी किंवा त्याच्या पृष्ठभागावर 5,000 पेक्षा जास्त भूसुरुंग पेरलेले असू शकतात. यात स्फोटकं आहेत. मागच्या आठवड्यात अमेरिकेने सांगितलेलं की, माइन्स पेरणाऱ्या इराणच्या 16 बोटी आम्ही नष्ट केल्या.

Follow Us
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर