
उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाच्या त्वचेची स्थिती अधिकच बिकट होते. कडक सूर्यप्रकाश आणि तीव्र उष्णतेमुळे त्वचेवर सनबर्न किंवा टॅनिंगची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे काळे डाग, मुरुम इत्यादी समस्यांमुळे चेहरा खराब दिसतो. जर या दिवसांमध्ये त्वचेची काळजी घेतली नाही तर चेहरा निस्तेज दिसू लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही अनेक प्रकारची प्रॉडक्ट वापरता पण कोणताही फायदा त्वचेवर होत नाही. कारण केमिकलयुक्त प्रॉडक्ट तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवतात.
त्याचबरोबर सुरकुत्या आणि रंगद्रव्याच्या समस्यांसारख्या वृद्धत्वविरोधी चिन्हे देखील चेहऱ्याचा संपूर्ण लूक खराब करतात. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने काळे डाग आणि रंगद्रव्य निर्माण होते. पण यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. काळ्या डागांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते घरगुती उपाय करू शकता ते आपण जाणून घेऊयात…
चेहऱ्यावरील काळे डाग दुर करण्यासाठी तुम्ही एका वाटीत अर्धा चमचा हळद, 3 चमचे बेसन पीठात मिक्स करा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्यात गुलाबजल मिक्स करा आणि जर तुमची त्वचा कोरडी असेल तर दूध टाका. आता तयार पेस्ट म्हणजेच फेस मास्क 15-20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमची पिगमेंटेशन आणि काळ्या डागांची समस्या दूर होईल.
टोमॅटोमध्ये लायकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे काळ्या डागांच्या समस्येपासून आराम देण्यास मदत करतात. दुसरीकडे मुलतानी माती त्वचेवरील घाण काढून टाकण्यास आणि ती स्वच्छ करण्यास मदत करते. ही पेस्ट बनवण्यासाठी 4 चमचे मुलतानी माती आणि 2 चमचे टोमॅटोचा रस मिक्स करा आणि लावा. तुम्ही ते आठवड्यातून दोनदा लावू शकता.
बदामांमध्ये व्हिटॅमिन ई असते जे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करते आणि चेहरा डागरहित बनवते. दुधामुळे सुरकुत्या आणि काळे डाग यांसारख्या वृद्धत्वविरोधी चिन्हे कमी होऊ शकतात.
कडुलिंब आणि तुळस या दोन्हीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे चेहऱ्यावरील पुरळ आणि मुरुमांची समस्या कमी करण्यास किंवा दूर करण्यास मदत करतात आणि त्वचा चमकदार आणि गुळगुळीत करतात.
संत्र्याची साल उन्हात वाळवा आणि नंतर ग्राइंडरमध्ये बारीक करा. आता त्याची पेस्ट बनवण्यासाठी या पावडरमध्ये मध मिसळा. ही पेस्ट लावल्याने त्वचेचा रंग स्वच्छ होतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)