अमेरिकेतील ‘टाईम सिस्टीम’ बदलणार! पण भारतात का नाही? जाणून घ्या रंजक कारण
अमेरिकेत डेलाइट सेव्हिंग टाइम कायदा लागू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या कायद्याला सनशाईन प्रोटेक्शन अॅक्ट असं संबोधलं गेलं आहे. त्यामुळे अनेकांना नेमकं काय आहे? याबाबत कल्पना नाही. भारतात असं का नाही? तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याची उत्तरं तुम्हाला पुढे मिळतील.

अमेरिका पुन्हा एकदा डेलाइट सेव्हिंग टाइम कायदा आणण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सनशाईन प्रोटेक्शन अॅक्ट बिल प्रस्तावित आहे. खरं तर हे बिल सिनेटच्या मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहे. पण बिलाचा विरोध अमेरिकेतील विविध भागात सुरू झाला आहे. तसेच बिलाच्या बाजूने आणि विरोधात मतं मांडली जात आहेत. अमेरिकेत असं बिल आणण्याची ही काय पहिली वेळ नाही. यापूर्वीही असा प्रयत्न झाला होता. मात्र त्यानंतर हे बिल मागे घेण्याची वेळ आली आहे. आता हे बिल सिनेटच्या मंजुरीसाठी पाठवलं गेलं आहे. जर तिथे मंजूर झालं आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यानी सही केली तर त्याचं कायद्यात रुपांतर होईल. पण अमेरिकेत सनशाईन प्रोटेक्शन अॅक्ट बिलाचं महत्त्व इतकं का आहे? नेमका विरोध का होत आहे? भारतात असा नियम लागू नसण्याचं कारण काय? सर्व प्रश्नांची उत्तरं पुढे मिळतील. डेलाइट सेव्हिंग टाइम म्हणजे काय? आता काय असतं? डेलाइट सेव्हिंग टाइम म्हणजे अमेरिकेत सध्या वर्षातून दोन वेळा वेळेत बदल केला जातो. मार्च महिन्यात म्हणजे...